पक्षनिष्ठा जोपासणाऱ्या ज्योतीताई सुरवसे यांची पुनश्च शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख पदी नियुक्ती

पक्षनिष्ठा जोपासणाऱ्या ज्योतीताई सुरवसे यांची पुनश्च शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख पदी नियुक्ती
निष्ठावंत शिवसैनिक तालुकाप्रमुख सतीश सपकाळ यांच्या वतीने ज्योतीताई सुरवसे यांचा सन्मान

प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611
अकलूज येथील सौ ज्योतीताई सुरवसे यांचे आजपर्यंतचे पक्ष कार्य पाहून तसेच सर्वसामान्यांना न्याय देणारे नेतृत्व गुण पाहून पक्षाने त्यांना पुन्हा एकदा शिवसेना माळशिरस महिला तालुका प्रमुख पदी नियुक्ती केली असून मुंबईतील अधिकृत कार्यालय बाळासाहेब भवन इथून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे मागील आठवड्यात र्तयस्थ महिलेची माळशिरस तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली होती पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या व प्रामाणिकपणे पक्ष बांधणी करणाऱ्या सर्व सुरवसेताई यांना न्याय देत तालुका प्रमुख पदावर पुनश्च नियुक्ती केली आहे सदर नियुक्ती ही आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना सचिव संजय मोरे साहेब, महिला सचिव तथा आमदार मनीषा कायंदे यांच्या हस्ते व तालुका संपर्कप्रमुख रवी आमले यांच्या उपस्थित करण्यात आली सदर नियुक्ती करण्याच्या अगोदर शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्याशी वरिष्ठानी चर्चा करीत निर्णय घेत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. सुरवसे ताई यांच्या पुनश्च निष्ठावंत शिवसैनिकात आनंदाचे वातावरण असून सर्वसामान्य नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत सुरवसेताई यांना शुभेच्छा दिल्या तसेच माळशिरस तालुका प्रमुख सतीश भाऊ सपकाळ यांच्या नातेपुते येथील शिवसेना भवन या ठिकाणी सौ.ज्योतीताई अविनाश सुरवसे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख सतीश भाऊ सपकाळ, तालुका उपप्रमुख संतोष गोरे, नातेपुते शहरप्रमुख समीर शेख,उपशहरप्रमुख निखिल पलंगे, पिरळे गटप्रमुख अनिल दडस मेजर, शिवसैनिक अनिल चव्हाण, वैद्यकीय मदत कक्ष संजय दनाने तसेच नातेपुते शहर प्रमुख दुवा शेख, उप शहर प्रमुख संगीता गोरे उपस्थित होते.तालुकाप्रमुख सतीश भाऊ सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दत्तमाई कचरे व शितल कोल्हारे यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी ज्योतीताई यांनी बोलताना सांगितले की ज्या काही शासकीय योजना असतील त्या गोरगरीब वर्गाला तळागाळापर्यंत त्या कशा पोहचतील, महिलांना बचत गटामार्फत ज्या योजना असतील त्याही त्या देण्याचा प्रयत्न करण्यात येईल तसेच महिला सक्षमीकरण करतील व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी माळशिरस तालुक्यामधील सर्व शिवसेना युवासेना तसेच महिला आघाडी हे सर्व कायम तत्पर राहतील अशी त्यांनी माळशिरस तालुक्यातील ग्वाही दिली यावेळी शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या