शेटफळ ते भांडगाव रस्त्याच्या कामाची चौकशी करा- मविसे

शेटफळ ते भांडगाव रस्त्याच्या कामाची चौकशी करा- मविसे

अन्यथा.…पुणे येथील अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार- अविराज माने 

प्रतिनिधी : इंदापूर : प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेच्या पुणे विभागाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती झांजुर्णे यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे अविराज माने यांनी निवेदन देऊन  
इंदापूर तालुक्यातील शेटफळ पाटी नजिक ते भांडगाव चालू असलेल्या कामाची।चौकशी करण्याची मागणी केली आहे.



इंदापूर तालुक्यातील शेटफळ पाटी नजिक ते भांडगाव चालू असलेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम केले जात असून रस्त्याचे खडीकरण कामांमध्ये मोठ्या प्रमाणात माती मिश्रित मुरूम वापरून काम केले जात आहे त्यामुळे रस्त्याचे आयुष्य जास्त काळ टिकणारे नसून चालू असलेले खडी करणाच काम हे गुणवत्ता पूर्ण नसून खडी करण करणे ऐवजी माती कारण करण्याचं काम संबंधित ठेकेदार करत असून या कमावरती शाखा अभियंता व उपअभियंता यांनी उपस्थित राहणे बंधनकारक असताना कोणतेही जबाबदार अधिकारी कामावरती उपस्थित राहत नाहीत आम्ही स्वतः काल दिवसभर रस्त्याच्या कामावरती थांबून होतो परंतु ना आपला शाखा अभियंता ना उपाभियंता कामावर आले याचाच अर्थ असा की संबंधित उप अभियंता व शाखा अभियंताअसे निवेदनात म्हटले आहे.

 

शेटफळ पाटी ते भांडगाव रस्त्यावर चालू असलेल्या कामांमध्ये ठेकेदाराबरोबर संगणमत करून भ्रष्टाचार करण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आपण तात्काळ या कामाची चौकशी करून संबंधित कामावरती उपस्थित न राहणाऱ्या उप आभियंता व शाखा अभियंता यांच्यावरती कारवाईची मागणी करून ७/०३/२०२३ कार्यकारी अभियंता श्री कुलकर्णी साहेब यांना दिले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.कार्यकारी अभियंता यांनी तक्रारी अर्जावरती कोणतीही चौकशी केली नाही उलट संबंधित अधिकारी यांना पाठीशी घालण्याचे काम केलेले आहे तरी निवेदनाची लवकरात लवकर दखल घेऊन चालू असलेल्या कामाची आपल्या स्तरावरती एक त्रयस्थ समिती नेमून या कामाची चौकशी करावी व दोषी असणाऱ्या अधिकारी यांच्या वरती कारवाई करावी आणि ठेकेदाराला काळी यादी मध्ये टाकण्यात यावे अन्यथा अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालय समोर दिनांक १०/६/२०२४ रोजी ठीया आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या