मौजे अकोले खुर्द तालुका माढा येथील श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च टेंभुर्णी महाविद्यालयामध्ये आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी गणपती फार्मसी महाविद्यालयाने या शिबिराचे आयोजन केले.या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, हिमोग्लोबिन या तपासणी केल्या. तज्ञ डॉ. व्ही.बी अनंतकळस यांनी रुग्णांची तपासणी केली व त्यांचे निदान करून त्यांच्यावर उपचार केले व आवश्यकत्या औषधे देण्यात आल्या.आरोग्य शिबिर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रूपाली बेंदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
या शिबिरासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे, संस्थेचे सचिव डॉ.आर. डी. बेंदगुडे, उपाध्यक्ष बाबासाहेब येडगे, डॉ. प्रशांत मिसाळ, प्रा. शिवराज ढगे ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.आशिष जाधव प्रा.मोनिका माळी यांनी कार्य केले.
0 टिप्पण्या