मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात १० हजार रुपयाची लाच घेताना.....!

पुणे :-
घोडेगाव येथील मंडल अधिकारी यांनी जमिनीचा फेरफार मंजूर करण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच घेताना, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून घोडेगाव तहसील कार्यालयासमोर अटक केली. मंडल अधिकारी योगेश रतन पाडळी(वय 38) खाजगी व्यक्ती लक्ष्मण सखाराम खरात (वय 61) असे रंगेहात दोघांना पकडले.
३६ वर्षीय नागरिकांने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार यांच्या मामाच्या मुलाने जमीन खरेदी केली होती त्या जमिनीचा फेरफार मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी योगेश पाडळे यांनी१० हजार रुपयांची मागणी केली.

   sponsor


for sponsorship contact us at : mahitisevabhavitimeslive@gmail.com

या तक्रारीची पडताळणी केली असता. लाज मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर  पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोडेगाव तहसील कार्यालयासमोर सापळा रचून तहसील कार्यालयासमोरील हॉटेलमध्ये तक्रारदारांकडून १०हजार रुपयांची लाच स्वीकारताना योगेश पाडळे यांना पकडण्यात आले. लक्ष्मण गायकवाड यांनी लाचेची मागणीस सहाय्य केले. म्हणून दोघांवर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरवयांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली पुढील तपास पोलीस निरीक्षक अलका सरक करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या