बारामती हद्दीमधील परवानाधारक देशी दारू विक्री करणारे विक्रेते हे ग्राहकाकडून छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम आकारून विक्री करत आहेत. हे सर्व . हे जर असे चालू राहिले तर ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी व त्याच्यावर नियंत्रण होण्यासाठी माहिती सेवाभावी संस्थेच्या वतीने उत्पादन शुल्क खात्याकडे तक्रारी अर्ज देण्यात आला आहे. ग्राहकांची होणारी खुलेआम लूट ही थांबवण्यात यावी आणि सदर परवानाधारककांवर कायदेशीर व कडक दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
मागील काही प्रकरणांमध्ये उत्पादन शुल्क खात्याने कारवाई करूनही परवानाधारक हे जर अशी कारवाई करत असतील तर आम्ही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून चालणारी लुट थांबवू.ग्राहकांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न हे उत्पादन शुल्क खाते सोडवणार याची हमी निरीक्षक मनाले, उपनिरीक्षक पाटील यांनी दिली.
sponsor
for sponsorship contact us at : mahitisevabhavitimeslive@gmail.com
0 टिप्पण्या