आज मळद-बारामती मध्ये नितीन झगडे यांचे निवासस्थानी मा युगेंद्रदादा पवार व्यवस्थापकीय संचालक, महा ऑरगॅनिक अॅन्ड रेस्यूडयू फ्री फार्मर्स असोसिएशन मोर्फा महाराष्ट्र. यांनी मधमाशी पालन व मधाच्या प्रोडक्षणची सविस्तर माहिती घेतली, यावेळी त्यांनी डोक्यावर प्रोटक्षण हेल्मेट घालून मधमाशांची जवळून पाहणी करून मधाच्या वेगवेगळ्या फ्लेवर बद्दल ची सविस्तर माहीती घेतली. तसेच नितीनयांचा मोठा भाऊ सतिश चंद्रकांत झगडे हे नोकरी निमित्त न्यूझीलंडला होते नुकतेच न्यूझीलंड वरून आलेेले आहेत, त्याांची सुद्धा सर्व विचारपूस मा दादांनी केली. पुढील कामे अशीच आणि योग्य प्रकारे चालू राहण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. काही अडीअडचणी किंवा काही मदत लागल्यानंतर काहीही संकोच न करता मदत माागण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
यावेळी दादांचे समवेत श्री प्रल्हाद वरे, सौ स्वाती शिगांडे, सागर पाटील, कोल्हापूर. प्रशांत डोंगरे, वाई. हर्षवर्धन मेढेकर, महाबळेश्वर. ज्ञानेश्वर सनस, स्वप्निल चादंगुडे, सचिन कावळे, वाल्मिक जाधव, सोनजाम. ता. दिंडोरी. जि. नाशिक. व शेतकरी उपस्थित होते.

0 टिप्पण्या