बारामती तालुक्यात त्रिदल सैनिक सेवा संघाचे भव्य व दिव्य उद्घाटन सोहळा पार .....!



प्रतिनिधी:- बारामती 
बारामती तालुक्यात सैनिक आपल्या दारी अभियान अंतर्गत  त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी बारामती तालुक्यात त्रिदल सैनिक सेवा संघाच्या शाखेचे भव्य व दिव्य उद्घाटन सोहळा पार पडला.बारामती तालुक्यात अनेक सैनिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक सैनिक व सैनिक परिवाराचे फोन येत होते.सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे.एकाच दिवसात बारामती तालुक्यात १८० सभासद झाले आहेत.

त्रिदल सैनिक सेवा संघाचा व कोणत्याही राजकीय पक्षाचा कसलाही संबंध नाही.व त्रिदल सैनिक सेवा संघाचे कोणत्याही पक्षाचे लागेबांधे नाही.त्रिदल सैनिक सेवा संघ ही संघटना कोणत्याही राजकिय पक्षाला न जुमानता निर्भिडपणे काम करत आहे व करत राहणार.त्रिदल सैनिक सेवा संघ ही संघटना महाराष्ट्र राज्यात अशी एक संघटना आहे.ती म्हणजे फक्त नि फक्त सैनिक व सैनिक परिवारासाठी काम करते.येथून पुढे त्रिदल सैनिक सेवा संघाच्या व्यासपीठावर फक्त नि फक्त सैनिक व सैनिक परिवारच असणार.

बारामती तालुक्यात सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी एक वर्षा शाखा अगोदर होयाला पाहिजे होती थोडा विलंभ झाला परंतु त्रिदल सैनिक सेवा संघांमध्ये युवा वर्गाचे वाढता पाठिंबा दिसून येत आहे.तसेच आमचे मार्गदर्शक व गुरूवर्य साहेबांचा मोठा सहभाग आहे.त्रिदल सैनिक सेवा संघ कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करणारी संघटना नाही.बारामती तालुक्यात सैनिक व सैनिक परिवाराचे काम करायचे म्हणले तर काही संघटनांवर राजकिय दबाब येत असल्याने सैनिक व सैनिक परिवाराची कामे होत नव्हती.

काही संघटना मुळे सैनिक व सैनिक परिवाराची कामे झाली नाहीत व सैनिक अडचणीत आले आहेत.सैनिक व सैनिक परिवाराने पुढे राजकीय लोकांच्या दबावालाबळी पडणार नाही.त्रिदल सैनिक सेवा संघाच्या शाखेचे भव्य व दिव्य उद्घाटन सोहळा पार पडल्याने बारामती तालुक्यातील सैनिक मोठ्या उत्साहाने अभिनंदन व शुभेच्छा देत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुका लेवला असी संघटना अस्थीत्वात येने गरजेचे झाले आहे. सभासत्वाच्ये नियम सांगावे. !!!!धन्यावाद !!!!!

    उत्तर द्याहटवा