त्रिदल सैनिक सेवा संघाच्या आंदोलनाला आले यश..!.


नगर जिल्ह्यात सेवारत सैनिकांच्या न्याय व हक्कासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून धरणे आंदोलन चालु होते.या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी नगर,पुणे,बीड जिल्ह्यातील त्रिदल सैनिक सेवा संघाचे पदाधिकारी धरणे आंदोलनामध्ये सामील झाल्याने.नगर जिल्ह्यात खळबळ उडाली.सेवारत सैनिक त्यांच्याच जागेत घराचे काम करत होते.परंतु काही लोकांनी काम बंद केले होते हे आंदोलन तीन दिवसांपासून चालु होते.या आंदोलनाचा मोर्चा त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.संदीप लगड,त्रिदल सैनिक सेवा संघाचे कोरकमिटीचे अध्यक्ष मा.अशोक चौधरी,त्रिदल सैनिक सेवा संघाचे प्रवक्ता मा.एस.के.आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे धरणे आंदोलन चालु होते.या आंदोलनाला तीन दिवस झाले होते.या आंदोलनाचा दखल नगर तालुक्याचे तहसीलदार मा.उमेश पाटील यांनी दोन्ही पार्टींना बोलावून तीन तास चर्चा केली.व सैनिक व सैनिक परिवाराला व दोन्ही पार्टींना न्याय मिळवून दिला.तहसीलदार मा.उमेश पाटील यांचे महाराष्ट्र राज्यातून सैनिक व सैनिक परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.तहसीलदार यांनी योग्य मार्ग काढल्याने त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून जे धरणे आंदोलन चालु होते.ते आंदोलन सोडण्यात आले.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवारास अडचण आल्यास त्रिदल सैनिक सेवा संघाशी संपर्क करावा असे जाहिर आव्हान त्रिदल सैनिक सेवा संघाचे नगर कार्याध्यक्ष मा.कुशल घुले यांनी केले.या आंदोलनाचे पुर्ण नियोजन त्रिदल सैनिक सेवा संघ नगर मुख्यालय टीमने केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या