बारामती शहर पोलीस स्टेशनची अवैधरित्या देशी दारू बनविणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली.
ही कारवाई आरोपी १)लक्ष्मी चव्हाण (दत्तवाडी,गुणवडी) २)अंबादास चव्हाण (दत्तवाडी,गुणवडी) यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 328 नुसार कारवाई करण्यात आली आहे
संबंधित आरोपी हे फार पूर्वीपासून अवैधरित्या देशी दारूची मोठ्या प्रमाणावर विक्री करत होते. त्यांच्यावर याआधी कारवाई झालेली होती. तरी संबंधित हे नव्याने आणि जागा बदलून मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करून दारू विक्री मध्ये चार-पाच गावात जम बसवला होता. त्यांच्या दारू विक्रीमुळे गरीब कुटुंबातील परिवारांना त्रास होत होता. या सर्व प्रकाराची तक्रार उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे साहेब यांच्याकडे करण्यात आली होती.
आरोपी अंबादास चव्हाण व लक्ष्मी चव्हाण हे देशी दारूचे अवैधरित्या उत्पादन करून पांढऱ्या रंगाच्या इंडिका या गाडीने गावोगावी पोहोच करत होते. आणि आपल्या घरी म्हणजे मेखळी रोडवरील जय मल्हार या चायनीज हॉटेलच्या शेजारी विक्री करत होते. या सर्व गोष्टींची माहिती मिळताच बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी सुनील महाडीक साहेब यांनी ताबडतोब कारवाई करण्यास सांगितले.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस इन्स्पेक्टर सुनील महाडिक, सह पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, उपनिरीक्षक सागर ढाकणे, सह पोलीस उपनिरीक्षक बापू जगदाळे, पोलीस कर्मचारी कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
0 टिप्पण्या