बारामतीत भीषण अपघात ...! अपघातात तिघांचा जागीच मृत्यू....

 
बारामतीत भीषण अपघात , अपघातात तिघांचा जागीच मृत्यू. कार आणि ट्रॅक्टर यांच्यात जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडुन आला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये दोन महिला आणि एका तरुणाचा समावेश आहे. मोरगावजवळ रात्री उशीरा हा अपघात झाला.

मिळालेल्या  माहितीनुसार, मोरगावनजिक भंडारी कुटुंबीय प्रवास करत असलेल्या कारची आणि एका ट्रॅक्टर-ट्रॉलीची धडक झाली. या भिषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सौ. अश्विनी श्रेणीक भंडारी, मिलिंद श्रेणीक भंडारी आणि सौ. कविता उदयकुमार शहा अशी अपघातातील मृत व्यक्तींची नावे असुन सदर अपघात ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.भंडारी ज्वेलर्स श्रेनिक भंडारी यांच्या पत्नी अश्विनी भंडारी आणि मुलगा प्रथमेश भंडारी यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. बारामतीतील या तिघांचा मृत्यू झाल्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे.या अपघातामध्ये गंभीर जखमी असलेल्या बिंदीया सुनील भंडारी यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या