वैयक्तिक भांडणाच्या वादातून महिलेचा निर्घृण खूण.!! बारामतीमधील कर्‍हावागज मध्ये.....



बारामती:- कर्‍हावागज येथे काल (रविवार) दुपारी ५० वर्ष महिलेच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना घडली. जुन्या भांडणाच्या कारणाचा राग मनात धरून गंगुबाई मोरे यांच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस तसेच कपाळावर व छातीवर धारदार कुर्‍हाडीने वार करून जीवे ठार मारून प्रमिला प्रमोद मोरे यांच्या अंगावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कुर्‍हाड घेऊन किरण दादा मोरे गेला. 
गंगुबाई व तिचेच शेजारी किरण दादा मोरे यांच्याशी काही वर्षापूर्वी किरकोळ भांडण झाले होते ते भांडण गावकऱ्यांनी त्यावेळी मिटवले होते.त्यानंतर दोन्ही कुटुंबे एकमेकाशी बोलत नव्हती काल दुपारी जेवणानंतर गंगुबाई तिचे दुसरे शेजारी कांतीलाल मोरे यांच्या परसात गेली होती सोबत तिचे दोन नातूदेखील होते. साधारणत: अडीच वाजता किरण मोरे हातात कुर्‍हाड घेऊन कांतीलाल यांच्या घराकडे धावत गेल्याचे लोकांनी पाहिले. तिथे असलेल्या गंगुबाईच्या डोक्यात कुर्‍हाडीचा घाव घातला. गंगुबाई यांची सून प्रमिला हिने हा प्रकार पाहिला आणि आरडाओरड केला व तिने किरण याच्या हातून कुर्‍हाड हिसकावण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने तिला बाजूला ढकलले आणि दुसरा घाव गंगुबाईच्या छातीवर केला. त्यानंतर त्याने प्रमिलावरही हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आसपासचे लोक जमा झाल्याने किरण तेथून पळून गेला गंगुबाई जागेवरच मृत्यू पावली.पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी बारामती येथील शासकीय रुग्णालयात हलविला. त्यानंतर किरण मोरे यालाही अटक करण्यात आली.
सदर गुन्हा भादवि ३०५,३०७ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ नुसार सह पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी दाखल केला व अधिक तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या