मागील काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात आर्थिक फसवणुकीची अनेक प्रकरणं उघडकीस येत आहे. विविध प्रकारचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांना जाळ्यात ओढलं जात आहे. अशाच प्रकारे गुंतवणूकवर दुप्पट परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून राज्यभरातील 560 हून अधिक दिव्यांगांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
सुयोग मेहता, चंचल सुयोग मेहता (दोघे रा. धायरी), अभिजर सैखउद्दीन घोडनदीवाला (साळुंखेविहार, पुणे), प्रदीप महारुद्र कोलते (चिंचवड), मिहिर संतोष गोखले (सदाशीव पेठ), धनंजय सुदामराव जगताप (कात्रज) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी हर्षल पिंजण यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सुयो अँड अभि एंटरप्रायजेस आणि प्लॅटिनियम इनव्हेस्टमेंट अँड फायनान्स ग्लोबल सोल्युशन नावाच्या दोन कंपन्या काढल्या होत्या. संबंधित कंपनीत गुंतवणूक केल्यास साठ दिवसांत पैसे दुप्पट करून देतो, असं आमिष आरोपींनी दाखवलं होतं. त्यासाठी आरोपींनी राज्यभरातील 560 हून अधिक मूकबधिर, अंध, कर्णबधिर दिव्यांगांना जाळ्यात ओढलं होतं. आरोपींनी दिव्यांकडून घेतलेली रक्कम फॉरेक्स ट्रेडिंगसाठी वापरून काही रक्कम वैयक्तिक खर्चासाठी वापरली आहे. अशा पद्धतीने आरोपींनी राज्यभरातील दिव्यांगांना तब्बल 5 कोटींचा चुना लावला आहे.
आरोपींनी सुरुवातीच्या काळात विश्वास संपादन करण्यासाठी बऱ्याच गुंतवणुकदार मूकबधिरांना, मित्र आणि नातेवाईकांना जास्तीची रक्कम दिली होती. यावर विश्वास ठेवून राज्यभरातील अनेक दिव्यांगांनी यामध्ये गुंतवणूक केली होती. भरपूर पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी गुंतवणूकदारांना परतावा देणं बंद केलं. या प्रकरणी हर्षल पिंजण यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांकडून वर्तण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू
0 टिप्पण्या