अमरावती:
सर्वसामान्यांचा नेता म्हणून परिचित असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी २०१४ च्या निवडणुकी दरम्यान निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीबद्दल खोटी माहिती न्यायालयाने निकाल देत राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्याची शिक्षा व २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी निवडणुकी पूर्वी दिलेल्या शपथपत्रात त्यांच्या मालकीच्या मुंबईला असलेला फ्लॅट संदर्भातील माहिती त्यांनी लपवले असल्या कारणाने चांदूर बाजार येथील गोपाल तिरमारे यांनी याविरोधात २७ डिसेंबर २०१७ ला आसेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
तत्कालीन ठाणेदार अजय आखरे यांनी संपूर्ण तपास करून चांदूरबाजार प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दाखल प्रकरण दाखल केलं होतं. त्या संदर्भातील सर्व साक्षीपुरावे न्यायालयाने तपासली असता त्यांना दोषी ठरवण्यात आले. ११ फेब्रुवारी रोजी त्यांना दोन व महिन्याची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंड अशाप्रकारची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहेत. यासंदर्भात माहिती देताना तक्रारदार गोपाल तिरमारे म्हणाले की, महाविकास आघाडीतील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जनतेची दिशाभूल केली. जनतेची फसवणूक करून निवडणूक जिंकले आणि त्यांच्यावर आरोप होता. आजच्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब झाले.
0 टिप्पण्या