बारामतीमधील महावितरण अभियंत्याने घेतला गळफास..!

 
बारामती शहर पोलिसांना शनिवारी दीड वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली की महावितरण सहाय्यक अभियंता मनीष माधवराव दंडवते हे दोन दिवसापासून कामावर आले नव्हते. व ते राहण्यासाठी वर्ग-2 बिल्डिंग फ्लॅट नंबर ६ A तिसरा मजला उर्जा भवन कर्मचारी वसाहत येथे राहण्यास होते. त्यांनी सकाळी त्यांचा डबेवाला त्यांना डबा देण्यासाठी आला. त्यावेळी त्यांनी दरवाजा उघडला नाही. दरवाजा ते उघडत नसल्याने त्यांनी डोकावून आत पाहिले. तेव्हा त्यांच्या निदर्शनास असे आले की किचनमध्ये नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेतलेला आहे.

त्यांनी ही माहिती बारामती शहर पोलीस ठाणेमध्ये कळवली असता. त्या ठिकाणी शहर पोलिसांनी जाऊन पाहणी केली . दरवाजा आत मधून बंद असल्यामुळे दरवाजा तोडून उघडावा लागला. अभियंत्यांची बॉडी खाली उतरून, पोस्टमार्टमसाठी सरकारी हॉस्पिटल सिल्वर जुबली बारामती या ठिकाणी पाठवण्यात आले. हे अभियंता याठिकाणी एकटेच राहत होते. त्यांचे कुटुंबीय सोलापूर या ठिकाणी राहण्यास असून याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आलेली आहे. दंडवते यांनी आत्महत्या का केली ? याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या