पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दिघी परिसरात आपटी बॉम्बचा स्फोट होऊन एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोन लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दिघी परिसरातील वडमुख वाडी इथं आज सकाळी ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घनेत राधा गवळी या पाच वर्षाची चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आरती गवळी आणि राजू गवळी ही दोन मुलं गंभीर जखमी झाली आहेत. जखमी मुलावर वाय सी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत पोलिसांना जवळपास तीस गावठी बॉम्ब सापडले आहेत.
राधा तिच्या दोन मित्रांसोबत कचराकुंडी जवळ खेळत असताना, तिला तिथे छोट्या बॉल सारख्या काही वस्तू पडलेल्या दिसल्या. त्यातलं एक बॉल सारखी वस्तू राधा खेळत असताना हा बॉम्ब स्फोट झाला आहे. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, राधाचा जागीच मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेत पोलिसांना घटनास्थळावरून जवळपास तीस देशी छोटे बॉम्ब गोळे सापडून आली आहेत. सापडलेली बॉम्ब गोळे ही शिकारीसाठी वापरण्यात येतात, अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे.
ज्या वस्तीच्या ठिकाणी ही छोटी बॉम्ब गोळे आढळून आली आहेत. त्या ठिकाणी पारधी आणि गवळी समाजाचा वस्ती आहेत. त्यामुळे या ठिकाणी ही बॉम्ब गोळे कुणी आणून टाकली? याचा तपास दिघी पोलीस करत आहेत.
0 टिप्पण्या