नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वीच शेंडीच्या डोंगरावरून पडून दोन ट्रेकर्सचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना पुण्यातील राजमाची किल्ल्याजवळ असलेल्या ढाक बहिरीच्या सुळक्यावरून पडून एका ट्रेकरचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादमधील काही तरुण ढाक बहिरीवर फिरण्यासाठी आले होते. प्रतिक आवळे असं मृत तरुणाचं नाव आहे. प्रतिक हा पंकज गावदाडे, सुजित लहाने, अभिषेक शेजुळ आणि सागर जैस्वाल या मित्रांसह ट्रेकसाठी आले होते. सुळक्यावर चढल्यानंतर अचानक प्रतीक आवळे याचा तोल गेला आणि तो खाली पडला. दगडावर पडल्यामुळे त्याला जबर मार लागला होता, यातच त्याचा मृत्यू झाला, असं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे.
प्रतिकाच्या मृत्यूमुळे इतक पाच मित्रांना जबर धक्का बसला. सोबत आलेल्या तुषार महाडिक आणि भारत रायकर या दोघांनी पाहिले होते. सर्वांनी धाव घेऊन प्रतिकचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती समजताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
ढाक बहिरीजवळ कर्जतचे गावकरी आणि यशवंती हायकर्स खोपोलीची टीम साहित्यासह ढाकच्या डोंगरावर पोहोचली. तोपर्यंत त्याच्या मित्रांनी प्रतिकचा मृतदेह घेऊन खाली उतरत होते. खाली सांगशी गावात आणल्यानंतर सर्वांना कर्जतला पाठवण्यात आले होते.
नाशिकमध्ये दोन ट्रेकर्सचा मृत्यू
काही दिवसांपूर्वीच नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये शेंडी डोंगरावर (manmad hill thumbs up) ट्रॅकिंगसाठी आलेल्या दोन तरुणाचा डोंगरावरून घसरून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हे दोन्ही तरुण ट्रेनर होते. अमोल वाघ आणि मयूर म्हस्के अशी या ट्रेनरची नाव आहे. हे दोघेही अहमदनगर येथील इंद्रप्रस्थ ट्रेकर ग्रुपचे ट्रेनर होते. अहमदनगर येथील इंद्रप्रस्थ ट्रॅकर ग्रुपची 15 जणांची एक टीम मनमाडपासून जवळ असलेल्या कातरवाडी भागातील शेंडीच्या डोंगरावर ट्रॅकिंग करण्यासाठी आली होती. त्यात 8 तरुणी आणि 7 तरुणांचा समावेश होता. सर्वजण डोंगरावर गेल्यानंतर सुरुवातीला ट्रेनर अमोल वाघ आणि मयूर म्हस्के यांनी खिळे ठोकत दोर बांधून डोंगराच्या शेंडीवर गेले त्यानंतर इतर 13 जण वरती चढले होते. सायंकाळी 13 जण खाली सुखरूपपणे खाली उतरले.
शेवटी ट्रेनर अमोल वाघ आणि मयूर म्हस्के खाली येत असताना एक खिळा निखळला त्यामुळे दोर सटकली आणि पाहता पाहता दोघे जण खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे
0 टिप्पण्या