पत्नीला वैतागलेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाचा आत्महत्येपूर्वी केलेला एक व्हिडीओ आता समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तो पत्नी पीडित असल्याचं त्याने सांगितलं. वारंवार पत्नीकडून त्रास दिला जात आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचं तरुणाने या व्हिडीओत म्हटलं आहे.
कोटाच्या उद्योग नगरमध्ये राहणारा अनिल मीणा याने गुरुवारी रात्री घरात गळफास लावून आत्महत्या केली. घटनेच्या वेळी त्याचे आई-वडील एका लग्नाच्या कार्यक्रमात गेले होते. तर लहान भाऊ मॉलमध्ये कामावर गेला होता. भाऊ परत आल्यानंतर हा भयंकर प्रकार समोर आला. यानंतर कुटुंबीयांनी मोबाइल पाहिला तर त्यात एक व्हिडीओ दिसला. यात अनिलने त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.
आत्महत्येपूर्वी अनिलने रडत रडत एक व्हिडीओ केला. यात त्याने सांगितलं की, पत्नीमुळे मी खूप त्रस्त झालोय. ती मला आणि माझ्या कुटुंबाला फसवण्याची धमकी देत आहे. मला एक लहान मुलगीही आहे. मी अनेकदा तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकतच नाही. आता मी आणि माझे कुटुंबीय तिच्या त्रासाला कंटाळलो आहोत. म्हणून मी आत्महत्या करतो. माझी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
मृत तरुणाचा भाऊ अरविंदने सांगितलं की, अनिलचं लग्न देवी खेडा बूंदी निवासी पूजासोबत 3 वर्षांपूर्वी झालं होतं. पूजा अधिक वेळ माहेरीच राहत होती. छोट्या छोट्या गोष्टीवरुन अनिल आणि कुटुंबातील सदस्यांशी भांडणं करीत होती. दिवाळीला ती माहेरीच होती. त्यानंतर संक्रातीच्या दोन दिवसांपूर्वी आली. संक्रातीला पुन्हा माहेरी निघून गेली. ती वारंवार कुटुंबातील कोर्ट केसमध्ये अडकवण्याची धमकी देत होती. जेव्हा तिला घटस्फोट देण्याबद्दल सांगण्यात आलं तर तिने त्यासही नकार दिला. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत
0 टिप्पण्या