रविवारी रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गुणवडी रोड, सार्थक कलेक्शन शेजारी श्री दत्त ऑटोलाइन्स या दुकानासमोर गुटखा, तंबाखूने भरलेली कॉलीस गाडी उभी आहे. अशी बातमी मिळताच त्यांनी शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथक व त्यांच्या कार्यालयातील पथकाला सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा मारला.
गणेश दत्तात्रय मदने वय २५ वर्षे मळद हा त्या ठिकाणी विविध कंपन्यांचा गुटखा विक्री साठी घेऊन आलेला होता. त्या ठिकाणी त्याची क्वालीस गाडी क्रमांक MH १० AS १९९९ आणि विविध कंपन्यांचा गुटखा विमल, गोवा,सौदागर यांची बोरी मिळून आल्या. त्याचा ताब्यातून माल किंमत ३ लाख १९ हजार रुपये व ५ लाख रुपये किमतीची क्वालिस गाडी,१० हजार रुपयांचा मोबाईल आणि 26 हजार रुपये गुटका विक्रीतून आलेले रोख पैसे मिळून आले. असा एकूण साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्यावर छापा दोन पंचांसमक्ष मारून कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, सुनील मोटे पोलीस नाईक दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण, कोठे यांनी केली
0 टिप्पण्या