उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांनी शहर पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर छापेमारी केली. नंतर बारामती शहर पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. सर्व बीट अंमलदार यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तसेच फक्त अवैध धंदेची माहिती काढण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यानुसार पथक कारवाई करत आहे.
फलटण रोड वरील जुगार खेळणाऱ्यावर कारवाई..
काल दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी १० वाजण्याच्या दरम्यान बारामती शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास माहिती मिळाली की काही लोक चव्हाण वस्ती फलटण रोड अनिल गुलाबराव चव्हाण यांच्या घराशेजारी सार्वजनिक जागेत नगरपालिका स्ट्रीट लाईट मध्ये तीन पाणी जुगार खेळत आहेत.
अशी माहिती मिळताच निरीक्षक सुनील महाडिक यांनी गुन्हे तपास पथकास सदर ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले. त्या ठिकाणी अनिल गुलाबराव चव्हाण, सागर गायकवाड, सलीम शेख, विजय गुळूमकर, संजय गवारे, विलास मोरे सर्वजण रा. चव्हाणवस्ती, कसबा हे त्या ठिकाणी तीन पाणी जुगार खेळत असताना मिळाले. त्यांच्याकडून रोख २.५ हजार रुपये, सव्वा लाख रुपये किंमतीची बुलेट एम एच ४५ एसी ५४४५ हिरो होंडा पॅशन एम एच १२ BM १९२९ या २ मोटारसायकली व वेगवेगळ्या कंपनीचे ६ स्मार्टफोन असा २ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून वरील सर्वांना या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे.
पानगल्लीमध्ये अवैध पद्धतीने मटका बुकिंग करणार्यावर कारवाई...
आज सकाळी ११:१५ सुमारास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना माहिती मिळाली की, पान गल्लीमध्ये अभि शिंदेच्या घराजवळ शेखर सोनवणे या मटका बुकीच्या जवळ शहरांमध्ये फिरून कल्याण नावाचा मटका जुगार घेणारे मोहन कुबेर, चंद शहा, महेश प्रल्हाद राऊत, काळूराम मुरलीधर जाधव, शंकर मारुती, राजेंद्र कोरडे हे आले असून शहरांमध्ये फिरून हे लोकांकडून मटका जुगार पैशाची देवाणघेवाण करून त्यांना मटक्याची पावती देत आहेत. अशी माहिती मिळताच पोलिस सहाय्यक निरीक्षक वाघमोडे, सहाय्यक पोलिस फौजदार संजय जगदाळे यांचे विशेष पथक त्या ठिकाणी पाठवून सर्वांना जागी ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे बॉलपेन, कल्याण मटक्याचा कार्बन, रोख ३५०० रुपये व १२ हजार रुपयाचा हँडसेट, वॉलपेपर, मटका चिट्टी कार्बन कॉपी असा १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळाला. सदरचा मटका मोबाईल वर पुढे मयूर कांबळे या मटका बुकिस फिरवत असल्याची आरोपीने सांगितले.
या सर्व कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आहेत. या सर्व कार्याचे श्रेय्य हे गणेश इंगळे साहेबांचे आहे.
0 टिप्पण्या