सरकारचा निषेध करण्यासाठी प्राणांतिक उपोषणाचा निर्णय...! "अण्णा हजारे ".

नगर
महाविकास आघाडी सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या निषेधार्थ प्राणांतिक उपोषणाचा इशारा देणारे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी धाडले होते. मात्र या पत्राची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांनीही दखल घेतलेली नाही. हजारे यांच्या पत्राला दोघांनीही उत्तरच दिलेले नाही. त्यामुळे हजारे यांनी पुन्हा दोघांना स्मरणपत्र पाठवले आहे.
हजारे यांनी पत्रात म्हटले आहे, की सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याचा परवाना देण्याचा निर्णय राज्यासाठी अत्यंत दुर्दैवी व भावी पिढय़ांसाठी घातक आहे. या निर्णयाबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी प्राणांतिक उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना रजिस्टर पोस्टाने पत्रव्यवहार केला. मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. राज्यात माझे उपोषण होईल, त्या वेळी कार्यकर्त्यांनी माझ्याप्रमाणे उपोषण करू नये. कारण जनतेच्या हितासाठी मी वेळोवेळी बावीस उपोषणे केली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या