बारामती मध्ये म्हाडा कॉलनी या ठिकाणी चालत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा.!

  
बारामती शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा मारून १२ जणांना ताब्यात घेतले. सदर ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. याप्रकरणी उपविभागीय कार्यालयातील पोलीस कर्मचारी आप्पासो दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी फारुक बागवान यांच्यासह इक्बाल निजाम जमादार (वय ६५ वर्षे), सलीम बाळासाहेब शेख (वय ३० वर्ष), सागर कांबळे (वय ३४ वर्ष) विजय दिलीप शेलार (वय ३५ वर्षे) सिकंदर कादर इमानदार (वय ४८ वर्षे) विनोद सुभाष सोनवणे (वय ४० वर्ष), युणुस शेख (वय ३४ वर्षे) उमेश कुमार पारसे,
निरंकार पोटे, बापूराव वाटोळे युनुस मुजावर अशा १२ जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कायद्यांतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातील ६१ हजारांचे मोबाईल २१ हजार ९४० अशी रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
याबाबत उप विभागीय पोलीस अधिकारी इंगळे साहेब यांना बातमी दारामार्फत माहिती मिळाली. बारामती शहरातील म्हाडा कॉलनी शिवाजी चौक येथे श्रीमती सायराबानू पठाण संशयित आरोपी फारुक बागवान हा त्याच्या ओळखीच्या लोकांना एकत्रित करून पैशावर तीन पत्ती जुगार खेळत आहे. तेव्हा तात्काळ माडा कॉलनी येथे गेल्यावर रूम कडे जात असताना एक जण पळून गेला.  अचानक छापा टाकला असता ९ जन हे गोलाकार बसून हातात तीन पाणी व चलनी नोटांचा ढीग दिसून आला.  हे सर्व जण तीन पत्ते खेळत असताना मिळून आलेले आहेत. त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे विवो कंपनीचे चार , सॅमसंग कंपनीचा एक , एप्पल कंपनीचा एक, नोकीया कंपनीचे दोन, रेडमी कंपनीचा एक , ओप्पो कंपनीचा एक असे तब्बल एकशे आठ हजारांची मोबाईल हँडसेट आणि त्यांच्यासोबत असलेले नोटांची २१ हजार ९४० रोख रक्कम रुपये असा एकूण ८२ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे असे फिर्यादीत म्हटले आहे याबाबत अधिक तपास शहर पोलिस करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या