बारामती शहर गुन्हे शोध पथकाने मोक्यामध्ये फरार असलेल्या आरोपीस केले जेरबंद.!


बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १२०/२०२१ भा.द.वी.क ३९५,३८६ सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी नितीन बाळासाहेब तांबे ( वय २४ वर्षे पाहुणेवाडी बारामती) हा गेले दीड वर्षापासून फरार फरार होता. फरार आरोपींच्या मागावर बारामती शहर गुन्हे शोध पथक होते. परंतु तो अद्याप पर्यंत मिळाला नव्हता. दि.०४/०२/२०२२ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत बारामती शहर गुन्हे शोध पथकासह आरोपी नितीन तांबे हा रामटेकडी पुणे येथे आला असल्याचे बातमी मिळाली.  त्या ठिकाणी तात्काळ पथक रवाना होऊन सापळा रचत सदर आरोपीस ताब्यात घेऊन जेरबंद केले. आरोपी नितीन बाळासाहेब तांबे याच्या नावे बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये एकूण ११ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी नितीन तांबे याच्यावर यापूर्वीदेखील मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. दुसरा मोक्का लागल्यापासून सदर आरोपी हा फरार होता. पुणे ग्रामीण पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर बारामती शहर पोलीस गुन्हेशोध पथकास त्याचा ठावठिकाणा लागल्याने तात्काळ त्यास ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे , पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे,पोलीस हवालदार कांबळे,पोलीस नाईक दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर,पोलीस कॉन्स्टेबल तुषार चव्हाण , दशरथ इंगोले यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या