वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत सणसर येथे फिर्यादी संभाजी शिवाजी आडके यांच्या घराची घरफोडी झाली होती. त्यानुसार पोलीस तपास करीत असताना या गुन्ह्यातील संशयित आरोपी नियोजन उर्फ बेर्ड्या राहणार सोनगाव याला ताब्यात घेतले असता हा गुन्हा त्याने त्याचा साथीदार लखन यासोबत केला असल्याची कबुली दिली .
याबाबत सविस्तर माहिती अशी की सणसर येथे घरफोडी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तपास करीत होते. त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही घरफोडी नियोजन उर्फ बेर्ड्या भोसले याने केली होती. तो बारामती सोनगाव रोडला येणार असल्याचे समजले असता,अतिशय हुशारीने सापळा रचत त्याला पकडले. ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता. घरफोडी मध्ये चोरी गेलेला मोबाईल मिळाला. त्याला अजून कसून चौकशी केली असता त्याच्या कडे अजून चार वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल मिळून आले. हा गुन्हा त्याने त्याचा साथीदार लखन सोबत केला असल्याचे कबूल करून त्याच्या ताब्यात असलेले मोबाइल आणि आरोपीला पुढील तपासाकरिता वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. तपासादरम्यान संशयित आरोपी नियोजन उर्फ बेर्ड्या संदीप भोसले याच्यावर यापूर्वी बारामती शहर पोलीस ठाण्यात भादवि ३७९,३०,४५४,४५७,३८० यासारखे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,बारामती उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, वालचंद नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातूरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, आसिफ शेख, अजय घुले, विजय कांचन, राजू मोमीन, पोलीस नाईक अभिजित एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, पोलीस कर्मचारी धीरज जाधव, वालचंदनगर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निकम, पोलीस हवालदार पाटमास, पोलीस नाईक स्वामी यांनी केली आहे.
0 टिप्पण्या