नगर मधली धक्कादायक घटना.! पत्नीच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी व्हॉल्‍व घालून खून..

अहमदनगर
पत्नीच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी व्हॉल्‍व घालून खून केल्याची धक्कादायक घटना (सोमवार) रात्री भिंगारमध्ये घडली. मंदा सुनील वैराळ (रा. वैद्य कॉलनी, जामखेड रोड, भिंगार, अहमदनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच भिंगार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खूनी सुनील हिरामण वैराळ याला ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. गंगाधर नवनाथ लोढे (रा. वैद्य कॉलनी, जामखेड रोड, भिंगार, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

बेकायदेशीर दारू धंद्यावर इंदापूर पोलिसांची कारवाई

सुनील व मंदा हे गंगाधर लोढे यांच्याकडे वैद्य कॉलनी येथील इमारतीत भाडेकरू म्हणून राहत होते. सोमवारी रात्री ११.१० वाजण्याच्या सुमारास सुनील वैराळ यांचा पत्‍नीशी वाद झाला. त्‍यांनी मंदा हिच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी व्हॉल्‍व घालून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी सुनील वैराळ याला अटक केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या