इंदापूर
बेकायदेशीर हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती इंदापूर पोलिसांना मिळताच इंदापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक टी . वाय . मुजावर यांनी त्यांच्या पथकासह काल सायंकाळी सहा वाजता हातभट्टीची दारू बनवत असणाऱ्या ठिकाणी धाड टाकली . यावेळी कॅन , रसायन यासह दारूसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला . - ही कारवाई इंदापूर तालुक्यातील भोडणी - लाखेवाडी हद्दीत ऊस पिकाच्या जवळ चालू असलेल्या दारू बनवत असलेल्या भट्टीवर करण्यात आली .
या प्रकरणी विजय पवार व भावड्या पवार ( राहणार लाखेवाडी , तालुका इंदापूर ) या दोघांनी आपल्या उसाच्या शेतामध्ये मानवी शरीरात अपायकारक असलेली अवैध हातभट्टी दारू बेकायदेशीररित्या काढत असल्याने त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३२८ , महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मुजावर यांनी दिली आहे .
इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी.वाय . मुजावर , सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक माने , महिला पोलीस हवालदार खंडागळे , पोलीस नाईक मोहिते , पोलीस नाईक चौधर , पोलीस कॉन्स्टेबल राखुंडे , महिला पोलीस कॉन्स्टेबल इंगोले यांनी सदरच्या कारवाईत सहभाग घेतला .

0 टिप्पण्या