दौंड मधील BSNL ऑफिसफिच्या सेक्युरिटी गार्डचा चोरट्यांकडून खून…!
दौंड
दौंड येथील भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या कार्यालयातील सुरक्षारक्षक म्हणून तैनात असलेल्या इसमाचा अज्ञात चोरट्यांनी तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. हि घटना सोमवारी (ता. २५) मध्यरात्री घडली आहे.प्रकाश सुखेजा (वय- ६०) असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड येथील भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या कार्यालयात प्रकाश सुखेजा हे खाजगी तत्वावर दुरध्वनी कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून कामकाज करीत होते. सोमवारी मध्यरात्री दोन ते तीन अज्ञात चोरटे आले त्यांनी दूरध्वनी कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला यावेळी तांब्याच्या तारा चोरी करीत असताना सुरक्षारक्षक प्रकाश सुखेजा यांनी चोरट्यांना प्रतिकार केल्याने त्यांचा खून करण्यात आला. तसेच दूरध्वनी कार्यालयातील तांब्याच्या तारांची चोरी करून पळून गेले. त्यानंतर प्रकाश अहुजा यांनी याच वसाहतीमध्ये राहत असलेल्या आपल्या मुलाला व सुनेला आवाज देऊन या घटनेच्या बाबतीत माहिती दिली.मुलगा मनोज याने लागलीच दौंड पोलिसांना घटनेची माहिती दिली.दरम्यान घटनेची माहिती मिळताच पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक नितेश मिटे,दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस,पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
0 टिप्पण्या