15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी घटनाबाह्य रीतीने ध्वजारोहण केल्याचा हिवरकर-पाटील यांचा आरोप
ध्वजारोहण करण्याचा नगराध्यक्षांचा हक्क असताना सुद्धा घटनाबाह्य रीतीने ध्वजारोहण केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
मुख्याधिकारी मा.माधव खांडेकर साहेब नगरपंचायत नातेपुते यांचा मनमानी अनागोंदी कारभार असल्याचा नागरिकांचा आरोप?
प्रतिनिधी/सचिन रणदिवे
15 ऑगस्ट 2022 स्वातंत्र्य दिना दिवशी घटनाबाह्य रीतीने नातेपुते नगरपंचायत तालुका माळशिरस येथे झेंडावंदन करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांना आर पी डी व ईमेलद्वारे निवेदन दिले आहे निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की भारतीय संविधानाने तसेच महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मधील कलमान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदाधिकारी व प्रशासन यांना कार्यकर्ते व जबाबदाऱ्या करून दिलेले आहेत तसेच राज्यघटनेने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचित घटकांना न्याय मिळावा या उद्देशाने आरक्षणाची तरतूद केलेली आहे सदरच्या आरक्षणाच्या केलेल्या तरतुदीमुळे समाजातील कोणताही घटक वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे तथापि 15 ऑगस्ट 2022 रोजी नातेपुते नगरपंचायत येथील सविधानिक पदावर असलेल्या अनुसूचित जातीच्या नगराध्यक्षा मा.सौ. उत्कर्षाराणी उमेश पलंगे यांनी तेथे प्रत्यक्ष उपस्थित असताना मा श्री मालोजीराजे देशमुख उपनगराध्यक्ष नातेपुते नगरपंचायत यांनी सदर ठिकाणी झेंडावंदन करण्याचा अधिकार बजावलेला आहे व राज्यघटनेचा अवमान केला आहे सदरची बाबी अत्यंत गंभीर स्वरूपाची असुन या ठिकाणी राज्यघटनेची पायमल्ली झालेली आहे त्यामुळे सदर ठिकाणी नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 नागरिक हक्क संरक्षण नियम 1977 चे मा. श्री माधवजी खांडेकर साहेब मुख्याधिकारी नातेपुते नगरपंचायत मा.श्री मालोजीराजे देशमुख उपनगराध्यक्ष नगरपंचायत नातेपुते तसेच जर या घटनेला मुकपणे मा.सौ. उत्कर्षाराणी उमेश पलंगे नगराध्यक्ष नातेपुते नगरपंचायत यांनी संमती दिली असेल तर वरील अधिनियम व कलमातील तरतुदीनुसार वरील सर्व अधिकारी व पदाधिकारी या घटनेस जबाबदार आहेत त्यामुळे आपणास विनंती आहे की उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून घटनाबाह्य कृत्य केल्याने निलंबनाची तात्काळ कारवाई करून वरील कलमानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागेल अन्यथा आंदोलनाच्या मार्गाचा अवलंब करावा लागेल व सदरचे आंदोलनावेळी होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आले आहे सदर निवेदनाची माहितीसाठी प्रत मा. विभागीय आयुक्त नगर विकास विभाग विधान भवन पुणे, मा. पोलीस अधीक्षक सोलापूर, मा. सहाय्यक आयुक्त नगर विकास विभाग जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांना देण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या