न्यायमूर्ती उदय उमेश ललित भारताचे ४९ वे सरन्यायाधीश…!

न्यायमूर्ती उदय उमेश ललित भारताचे ४९ वे सरन्यायाधीश…!

पुणे 
 केंद्र सरकाच्या अधिसूचनेनुसार, न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची बुधवारी भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती ललित यांना २७ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ दिली. तसेच ललित ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होतील. त्यांचा कार्यकाळ ७४ दिवसांचा असेल.मुख्य न्यायमूर्ती यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती आणि तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना हात जोडून अभिवादन केले. रजिस्टरवर सही केली, त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपतींना हात जोडून अभिवादन केले. त्यानंतर न्यायमूर्ती ललित व्यासपीठावरुन खाली उतरले आणि पहिल्या रांगेत एका कोपऱ्यात बसलेल्या आपल्या वडिलांच्या समोर जाऊन उभे राहिले. वरिष्ठ वकील असलेले यू आर ललित यांच्या पायाला हात लावून त्यांनी वडिलांचे आशीर्वाद घेतले. हे दृश्य पाहून राष्ट्रपती भवनात असलेल्या सगळ्यांनाच सर्वोच्च न्यायमूर्तींबाबतचा आदर वाढला. त्यावेळी एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर ललित यांनी परिवारातील इतर सदस्यांनाही वाकून नमस्कार केला. 

जस्टिस ललित यांचा कार्यकाळ ७४ दिवसांचा असणार आहे. ते आठ नोव्हेंबरला रिटायर होणार आहेत. त्यांच्यानंतर सर्वात अनुभवी न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे मुख्य न्यायमूर्ती होतील. न्यायमूर्ती ललित यांना वकिलांच्या बार संघटनेतून २०१४ साली थेट सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती केले होते. त्यांच्यापूर्वी हा मान न्यायमूर्ती एस एम सिकरी यांना १९७१ साली मिळाला होता. शनिवारी आयोजित या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, कायदेमंत्री किरण रिजिजू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, न्यायमूर्ती ललित यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९५७ साली झाला होता. ते महाराष्ट्रातील आहेत. १९८३ साली त्यांनी वकिलीची सुरुवात मुंबई हायकोर्टातून केली होती. त्यानंतर १९८६ साली ते दिल्लीला शिफ्ट झाले. तिथे गुन्हेगारीच्या प्रकरणात चांगले वकील असा नावलौकिक त्यांनी मिळवला. २ जी केसमध्ये त्यांना २०११ साली सुप्रीम कोर्टात विशेष सरकारी वकील नेमण्यात आले. १३ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांना थेट सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या