प्रतिनिधी :- दौंड
महाराष्ट्र राज्यातील सैनिक संघटनेच्या अध्यक्षांनी स्वतःहाच्या हितासाठी व स्वार्थासाठी कोणत्याही राजकिय पक्षामध्ये प्रवेश करू नये.असा इशारा त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप लगड यांनी दिला आहे.राजकिय पक्षामध्ये जर सैनिक संघटनेच्या अध्यक्षांना जायचे असेल तर सैनिक संघटनेचा राजीनामा दिलाच पाहिजे.राजीनामा न देता राजकिय पक्षामध्ये प्रवेश केला तर त्या अध्यक्षांना सैनिक व सैनिक परिवार त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.स्वत:हाची घरे भरण्यासाठी व स्वत:हाच्या मतलबासाठी जर काही संघटनेचे अध्यक्ष सैनिक व सैनिक परिवाराची दिशाभुल करत असतील तर त्या अध्यक्षांनाच नव्हे तर त्या संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय सैनिक व सैनिक परिवार गप्प बसणार नाही.
महाराष्ट्र राज्यात सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी व ज्या सैनिक व सैनिक परिवारावर अन्याय व अत्याचार होतो त्या ठिकाणी एकच संघटना महाराष्ट्र राज्यात कार्यारत आहेत ती संघटना म्हटले की सर्वात अगोदर नाव त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना त्या ठिकाणी सैनिक व सैनिक परिवाराला मदत करते.त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना फक्त नि फक्त जवानांची संघटना आहे या संघटनेत राजकिय दोन टक्के माजी सैनिकांना व अधिकारी वर्गाला सभासदत्व दिले जात नाही.या संघटनेत चुकून हुकून दोन टक्के राजकिय माजी सैनिक व अधिकारी वर्गाला सभासदत्व दिले तर त्यांची काहीच दिवसात त्रिदल सैनिक सेवा संघामधून हकालपट्टी होते हा त्रिदल सैनिक सेवा संघाचा नियम आहे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार फार हुशार आहे.तरी राजकिय दोन टक्के माजी सैनिकांनी सैनिक व सैनिक परिवाराची दिशाभुल करू नये असा इशारा त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा संदीप लगड यांनी दिला आहे.
त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी तीन वर्षांपासून रात्रीचे दिवस करून सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र आणण्याचे काम केले आहे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम केले आहे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक अडीअडचणी सोडविण्यासाठी अनेक आंदोलन व उपोषण केले आहेत.त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा संदीप लगड,नवनिर्वाचित त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे अध्यक्ष मा.जे.के.कटके, नवनिर्वाचित त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता मा.विक्रम जगताप,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष मा.अंकुश खोटे,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मा.काशिनाथ पंडित,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क अधिकारी मा.राजेंद्र कापरे व महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष व त्रिदल सैनिक सेवा संघाचे सर्व पदाधिकारी रात्रीचे दिवस करून महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या न्याय व हक्कासाठी लढत आहेत.महाराष्ट्र राज्यातील जे दोन टक्के राजकिय माजी सैनिक आहेतते राजकिय पक्षाचे काम करतात व स्वत:हाची घरे भरतात व या दोन टक्के राजकीय माजी सैनिकांच्या पाठीशी उभा राहू नये हे दोन टक्के राजकिय माजी सैनिक स्वतःहाच्या हितासाठी दिशाभुल करून राजकिय पक्षाच्या मान्यवरांना सांगतात की,महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार आमच्या पाठीशी आहे.त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराने जागे होऊन अशा दोन टक्के माजी सैनिकांना धडा शिकवण्याची काळाची गरज आहे.दोन टक्के राजकिय माजी सैनिकांनपेक्षा सैनिक व सैनिक परिवार दोन कदम पुढे आहे.जे सैनिक राजकिय पक्षामध्ये सैनिक व सैनिक परिवाराची दिशाभुल करून स्वतःहाची घरे भरण्यासाठी व स्वतःहाच्या हितासाठी प्रवेश करत असेल तर महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार त्या राजकिय दोन टक्के माजी सैनिकाला जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही.त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराने जागे होण्याची गरज आहे.
0 टिप्पण्या