प्रेम प्रकरणातून कोयत्याने वार करत एकाचा खून ..? बारामतीतील धक्कादायक घटना...!
बारामती :
बारामतीतील श्रीरामनगर मध्ये भरदिवसा कविवर्य मोरोपंत शाळेजवळ ५० वर्षीय व्यक्तीवर कोयत्याने वार करत निर्घुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शशिकांत कारंडे,वय.५० वर्षे (रा. श्रीरामनगर,बारामती,जि.पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून गुरुवारी दुपारी ६.०० च्या सुमारास ही घटना घडली.हा सर्व प्रकार प्रेम प्रकरणातून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
कारंडे हे त्यांच्या नातवाला नेण्यासाठी कविवर्य मोरोपंत शाळेत आले होते. याच दरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, बारामती शहरात काही दिवसांपूर्वी प्रेमात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला झाला होता.त्याच प्रकरणातून आजचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पोलिसांना या घटनेची वार्ता मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचून आरोपींचा शोध सुरु केला आहे.
0 टिप्पण्या