बारामती तालुका पोलीस, स्टेशनची धडाकेबाज कामगिरी, मोटार सायकल चोरी करणारी टोळी केली गजाआड, दोन टेम्पो भरून२७ मोटार सायकली केल्या हस्तगत...!
मागील काही महिन्यापासून बारामती तालुका पोलीस ठाणे हददीतील सुभद्रा मॉल, महिला हॉस्पीटल,व्ही.पी कॉलेज, पेन्सिल चौक परिसरातून मोटार सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राम कानगुडे, पो. नाईक अमोल नरूटे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय मदने शशिकांत दळवी, दिपक दराडे यांना दिली होती. त्याप्रमाणे सदर पथकाने पोलीस ठाणे अभिलेखावरील मो.सायकल चोरी करणारे आरोपी तसेच बारामती शहर परिसरातील अनेक सीसीटिव्ही कॅमे-याचे फुटेज तपासून तांत्रिक माहिती वरून संशयीत आरोपींची नावे
1. विजय अशोक माने (वय 19 वर्षे. )
2 प्रदिप रघूनाथ साठे (वय 22 वर्षे) सध्या राहणार शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा
3. प्रेम सुभाष इटकर (वय 19 वर्षे) दोघे राहणार. मिलींदनगर, जामखेड, जि. अहमदनगर
4. संतोष तुकाराम गाडे (वय 42 वर्षे) रा. अंमळनेर,ता.पाटोदा,जि.बीड यांना ताब्यात घेवून वेगवेगळया युक्त्या वापरून त्यांना बोलते करुन त्यांच्याकडून आता पर्यंत स्कुटी, पल्सर, स्पेलंडर अशा वेगवेगळ्या कंपनीच्या 13लाख 50 हजार रूपये किंमतीच्या 27 दुचाकी मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. सदर चोरीस गेलेल्या मोटर सायकली पैकी काही मोटार सायकली आरोपींनी पुरून ठेवल्या होत्या. त्या सर्व हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. सदर अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापुर्वी दरोडयाचा प्रयत्न, चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींवर गुन्हे भादवि कलम 379 मोटरसायकल चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले असून आणखीन ही गुन्हे उघडकीस येण्याच्या शक्यता आहे. तसेच या गुन्हेगारांकडे आणखीन मोटरसायकली मिळण्याची शक्यता आहे त्याबाबत बारामती तालुका पोलीस स्टेशन आणखी तपास करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पो.हवा. राम कानगुडे, पो.नाईक अमोल नरूटे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, दिपक दराडे यांनी केलेली आहे.
0 टिप्पण्या