प्रतिनिधी :- दौंड
महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र करण्यासाठी सैनिक आपल्या दारी अभियान अंतर्गत त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून गाव तेथे शाखा काढण्यासाठी नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत.त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य,त्रिदल माजी सैनिक सेवा संघ,त्रिदल माजी सैनिक संघ,त्रिदल सैनिक सेवा संघ या संघटना त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून धरमादायी आयुक्तांकडे संघटना रजिस्टेशन करण्यात आल्या आहेत व अनेक संघटना महाराष्ट्र राज्यात त्रिदलच्या नावाने अनेक संघटना रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे.परंतु महाराष्ट्र राज्यात ज्या शाखेचे उध्दघाटन सोहळा होणार आहे.किंवा बॅनर लावण्यासाठी नियम व अटींचे पालन केले जाणार आहे.
बॅनरवर नाव त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्य शाखा क्र.१ व शाखेचे नाव त्या बॅनवर टाकले जाणार आहे.त्या शाखेचे पदाधिकारी यांची निवड करताना स्थानिक पदाधिकारी यांची मिटिंग घेवूनच पदाधिकारी यांची निवड करण्यात येणार आहे,ज्या पदाधिका-याना त्रिदल सैनिक सेवा संघटनेचे विचार आवडत नसतील तर त्या पदाधिकारी यांना त्रिदल सैनिक सेवा संघटनेचे सभासदत्व दिले जाणार नाही,ज्या पदाधिका-याची निवड झाल्यानंतर त्या पदाधिका-यांचा शपथविधी होणार,या संघटनेत अधिकारी वर्गाला व दोन टक्के राजकिय माजी सैनिकांना सभासदत्व दिले जाणार नाही.ही संघटना फक्त नि फक्त जवानांची संघटना आहे.
महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराची हक्काची संघटना म्हटले की,सर्वात पुढे नाव येते त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यात ९४२ शाखा आहेत.तीन वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या १०००० हून अधिक अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत केली आहे.त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही राजकिय पक्षाचा संबध नाही.काही लोक संघटनेचा अध्यक्ष होतात व सैनिक व सैनिक परिवाराचा गैरफायदा घेवून राजकिय पक्षात प्रवेश घेवून स्वतःहाचा स्वार्थ पाहतात.परंतु त्रिदल सैनिक सेवा संघटनेत हा प्रकार चालत नाही.
त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेने महाराष्ट्र राज्यातील गावस्तरीय,शहरातील गल्ली-गल्लीत,चौका-चौकात,तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय त्रिदलच्या नावाने धरमादायी आयुक्तांकडे रितसर रजिस्ट्रेशन करून सर्व संघाना एकत्र करून संघटना काढली आहे.
त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना फक्त नि फक्त सैनिक व सैनिक परिवारासाठी (पॅरामिलेर्टी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स)काम करते महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला अडीअडचणी आल्यावर त्रिदल सैनिक सेवा संघटनेशी संपर्क करावा आपली अडचन त्वरीत दूर केली. त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप (भाऊ) लगड यांच्याशी संपर्क करा.संपर्क ८९८१७७७१७१/ ९४०३१७७७११/६३९११७७१७१/६३८९१७७१७१ या नंबरवर संपर्क केल्यानंतर त्याच तालुक्यातील टीम आपल्या मदतीला येवून आपली अडचन १००% सोडविली जाणार आहे.फक्त नि फक्त एक काॅल या मिसकाॅल या मॅसेज पाठवा.
टिप :- त्रिदलच्या नावाखाली कोण पैसे मागितले तर सावधान कोणाही पैसे देवू नये.काही लोक त्रिदलच्या नावाचा गैरफायदा घेवून आर्थिक फसवणूक करू शकतात तरी आपण जर त्रिदलच्या नावाखाली आर्थिक देवाण-घेवाण केल्यास त्यास त्रिदल सैनिक सेवा संघटना जबाबदार राहणार नाही याची नोंद महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराने घ्यावी.त्रिदलच्या नावाखाली कोण पैसे मागत असेल तर त्वरीत त्रिदल सैनिक सेवा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड यांच्याशी वरील संपर्कावर संपर्क करावा.
0 टिप्पण्या