प्रतिनिधी :- दौंड
महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र करण्यासाठी व सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना करण्यात आली होती.महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षांपासून दहा हजाराहून अधिक सैनिक व सैनिक परिवाराची कामे करण्यात आली आहेत महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात काही गावात मिळून त्रिदल सैनिक सेवा संघटनेच्या ९४३ शाखा काढण्यात आल्या आहेत.रात्रीचे दिवस करून महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र आणण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड व सर्व त्रिदल सैनिक सेवा संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक व गुरूवर्य व सर्व पदाधिकारी साहेबांनी संघटना उभी करण्यासाठी मेहनत व कष्ट घेतल्याने आज महाराष्ट्र राज्यात एकमेंव जवानांची संघटना म्हटले की आजही त्रिदल सैनिक सेवा संघटनेचे नाव सर्वात पुढे येते.महाराष्ट्र राज्यातील या संघटनेत चुकीचे पदाधिकारी आले तर जास्त दिवस टिकत नाही.दोन टक्के राजकिय माजी सैनिक यांनी एकत्र येवून त्रिदल सैनिक सेवा संघटना तोडण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु ज्यांनी ज्यांनी त्रिदल सैनिक सेवा संघटनेच्या विरोधात व त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड व महाराष्ट्र राज्यातील मार्गदर्शक व गुरूवर्य साहेबांच्या व पदाधिकारी साहेबांच्या विरोधात ज्यांनी अफवा पसरवल्या होत्या ते लोक आज कुठेच दिसत नाही.एकदा त्रिदल सैनिक सेवा संघटनेतून ज्या लोकांना काढले जाते त्यांना पुन्हा त्रिदल सैनिक सेवा संघटनेत घेतले जात नाही हा खरा त्रिदल सैनिक सेवा संघटनेचा इतिहास आहे.त्रिदल सैनिक सेवा संघटनेमध्ये जेष्ठ मार्गदर्शक व गुरूवर्य व पदाधिकारी साहेब निस्वार्थपणे व स्वाभिमानाने काम करत आहेत.आजही महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला माहित आहे की,त्रिदल म्हटले की संदीप(भाऊ)लगड असे का? महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील शहिद वीर पत्नी,शहिद माता-पिता,अपंग सैनिक,सेवारत सैनिक,माजी सैनिक,सैनिक व सैनिक परिवाराला(पॅरामिलेर्टी,आर्मी,नेव्ही,एअरफोर्स)अडीअडचणी कोण उभा राहते ते महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला तोंडाने सांगण्याची गरज नाही.हे सर्व सैनिक व सैनिक परिवाराचे अंतकरण सांगते याचा आपला सेवक संदीप लगड यांना सार्थ अभिमान आहे असे ते पत्रकारांशी बोलत होते.येत्या सहा महिन्यात अहमदनगर शहरातील गल्ली-गल्लीत,चौका-चौकात त्रिदल सैनिक सेवा संघटनेच्या ७५ शाखा धरमादायी आयुक्तांकडे रितसर रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे.अहमदनगर शहरातील शाखा काढण्यासाठी व शाखेचे उद्घाटन कसे व कोणत्या प्रकारे करायचे हे सर्व नियोजन त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष मा अंकुशजी खोटे यांच्याकडे धुरा देण्यात आली आहे. त्रिदल सैनिक सेवा संघटनेत जे पदाधिकारी वेळ देवून निस्वार्थपणे सैनिक व सैनिक परिवाराची सेवा करतात त्यांना महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार आदरच करतो यामुळे त्रिदल सैनिक सेवा संघटनेच्या प्रत्येक तालुक्यातील गावात शाखेचे उध्दघाटन करण्याचे काम चालु आहे.काही लोकांना त्रिदल सैनिक संघटनेचे व त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड यांचे विचार आवडत नसते तर त्यांनी आपल्या गावात त्रिदलच्या नावाने शाखा काढली असती का?ज्या पदाधिकारी यांना आपली चुक कळते त्या पदाधिकारी यांना माहित आहे की,त्या पदाधिकारी साहेबांना त्रिदल सैनिक सेवा संघटनेशिवाय पर्याय नाही.हे पुर्ण महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला माहित आहे.परंतु त्या पदाधिकारी साहेबांना माहित आहे की,पुन्हा त्रिदल सैनिक सेवा संघटनेत घेतले जात नाही.
महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला जाहिर आव्हान करण्यात येते की,अडीअडचणी असल्यास त्वरीत त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेशी त्वरीत संपर्क साधावा असे जाहिर आव्हान त्रिदल सैनिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड यांच्याशी करावा.संपर्क ८९८१७७७१७१/९४०३१७७७११/६३९११७७१७१/६३८९१७७१ ७१या नंबरवर एक काॅल व मिसकाॅल या मॅसेज करा त्वरीत आपली अडचन दूर केली जाईल.
0 टिप्पण्या