कदमवाडी येथील ग्रामसेवक शिंदे याची दप्तर चौकशीसाठी दलित महासंघाचे गटविकास अधिकारी यांना निवेदन

कदमवाडी येथील ग्रामसेवक शिंदे याची दप्तर चौकशीसाठी दलित महासंघाचे गटविकास अधिकारी यांना निवेदन....!



रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींची व दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामांची चौकशी करण्याची निवेदनात मागणी

प्रतिनिधी-माळशिरस 

मौजे कदमवाडी येथील ग्रामसेवक श्री . शिंदे यांच्या कार्यकाळातील कदमवाडी या ठिकाणची संपूर्ण दफ्तर चौकशी करण्यात यावी . तसेच यांच्या कार्यकाळात दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी कारण दि . 22/008/2022 रोजी कदमवाडी या ठिकाणची तहकूब झालेल्या ग्रामसभेतून सरपंच, ग्रामसेवक यांनी झालेल्या कामांची ग्रामस्थांनी माहिती विचारली असता चक्क ग्रामसभेतून पळ काढला कारण भरग्रामसभेतून पळ काढला म्हणजे नक्कीच सरपंच आणि ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास येत आहे? तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहीरींचीदेखील चौकशी करण्यात यावी या सर्व प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात संगनमताने भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे . तरी आपण आमच्या निवेदनाची दखल घ्यावी अन्यथा दलित महासंघांचे संस्थापक अध्यक्ष प्रा . डॉ . श्री . मच्छिंद्र सकटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ०८ / ० ९ / २०२२ रोजी हालगीनाद आंदोलन गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात हलगीनाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे निवेदनची माहिती साठी प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पंचायत समिती माळशिरस,माळशिरस पोलीस स्टेशन यांना दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या