प्रतिनिधी :- दौंड
श्रीगोंदा तालुक्यातील त्रिदल सैनिक सेवा संघ व त्रिदल महिला शक्ती आघाडीच्या पदाधिकारी यांच्यामध्ये फेरबदल करण्यात येणार आहे.पदाधिकारी यांची निवड अटी व नियमानुसार करण्यात आहे.ज्या पदाधिकारी यांना त्रिदल सैनिक सेवा संघाचे विचार आवडत नसतील तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा त्वरीत द्यावा.ज्या पदाधिकारी यांना वेळ देता येत नसेल तर त्यांनाही त्रिदल सैनिक सेवा संघ व त्रिदल महिला शक्ती आघाडीच्या पदाधिकारी यांनी पदाचा राजिनामा द्यावा.त्रिदल सैनिक सेवा संघ श्रीगोंदा तालुक्याचा फेरबदल करण्यात येणार आहे.ह्या पदाचा फेरबदल त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य,त्रिदल सैनिक सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड,त्रिदल सैनिक सेवा संघाचे कोरकमिटीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.जे.के.कटके,त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष मा.भाऊसाहेब रानमाळ,त्रिदल सैनिक सेवा संघाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष मा.संदिपजी सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित पदाधिकारी यांची निवड करण्यात येणार आहे.
त्रिदल सैनिक सेवा संघ वाढविण्यासाठी सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी जे पदाधिकारी वेळ देवू शकतात त्याच पदाधिकारी यांची निवड करण्यात येणार आहे.त्याच पध्दतीने श्रीगोंदा तालुक्यातील माय-माऊली,बहिणी व भगिनींना एकत्र करण्यासाठी त्रिदल महिला शक्ती आघाडी श्रीगोंदा तालुकाध्यक्षा यांची निवड करण्यात येणार आहे.त्याच पध्दतीने श्रीगोंदा तालुक्यातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र करण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात येणार आहे.येत्या दोन दिवसात श्रीगोंदा तालुक्यातील काही पदाधिकारी यांची होणार फेरनिवड तर काही नवनिर्वाचित पदाधिकारी यांची निवड करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या