प्रतिनिधी :- अहमदनगर
सैनिक आपल्या दारी अभियानात अंतर्गत त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून अहमदनगर शहरातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र आणण्यासाठी व सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अहमदनगर शहरात गल्ली-गल्लीत,चौका-चौकात त्रिदल माजी सैनिक सेवा संघाच्या ७५ शाखा धरमादायी अहमदनगर आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे.अहमदनगरच्या शहराशेजारील गावातही शाखा काढण्यात येणार आहे.या माध्यमातून सैनिक व सैनिक परिवार एकत्र आणण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.
अहमदनगर शहरातूनच गल्ली-गल्लीत व चौका-चौकात शाखा काढण्याची संकल्पना त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड यांची आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्व सैनिकांना मान-सन्मान मिळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.काही दोन टक्के माजी सैनिक अहमदनगर एका गावातील या शहरातील एका ठिकाणचे रजिस्ट्रेशन अहमदनगर धरमादायी आयुक्तांकडे करून सैनिक व सैनिक परिवाराची दिशाभुल करतात व म्हणतात आमची संघटना महाराष्ट्र राज्याची आहे.महाराष्ट्र राज्याची संघटना काढायची असेल तर अहमदनगर जिल्ह्याचा विभाग नाशिक आहे.नाशिक या ठिकाणी जावून संघटना रजिस्ट्रेशन केल्यानंतर ती संघटना महाराष्ट्र राज्याची होती.महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही विभागात त्रिदल नाव मिळाले असेल तर पुन्हा त्रिदल नाव हे भेटत नाही.हा लेख विस्तारमध्ये टाकला आहे की,दोन टक्के माजी सैनिक सैनिक परिवाराची दिशाभुल करू शकत नाहीत.त्यामुळे अहमदनगर शहरात गल्लीचा व चौकाचा पत्ता बदली झाला की,त्रिदल माजी सैनिक सेवा संघ या संघटनेचे रजिस्ट्रेशन होणारच परंतु त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे रजिस्ट्रेशन महाराष्ट्र राज्याचे झाल्याने महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यात त्रिदल सैनिक सेवा संघाच्या नावाने संघटना रजिस्ट्रेशन होत नाही.परंतु याचाही धरमादायी आयुक्तांकडे चौकशी करण्याची गरज आहे.
अहमदनगर शहरात त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून त्रिदल माजी सैनिक सेवा संघ या संघटनेच्या अहमदनगर धरमादाय आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन सर्व प्रथम नागापूर शाखेचे झाले आहे.अहमदनगर शहरातील सर्व सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र घेवून अहमदनगर शहरात ७५ शाखा गल्ली-गल्लीत,चौका-चौकात काढण्याचे काम त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संदीप(भाऊ)लगड यांनी केले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील जे पदाधिकारी त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेत होते पण काय बाहेर पडले असतील त्याही पदाधिकारी यांना जर त्रिदल सैनिक सेवा संघाचे व त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संदीप(भाऊ)लगड यांचे विचार आवडत असतील तर आपल्या गावात,गल्लीत,चौकात त्रिदल माजी सैनिक सेवा संघ या संघटनेची या त्रिदलच्याच नावाने संघटना काढली तर याचा संस्थापक अध्यक्ष यांना सार्थ अभिमान असेल.परंतु अहमदनगर शहरातील सर्व सैनिक व सैनिक परिवाराने आपल्या गावात व गल्लीत,चौकात शाखा काढून सैनिक व सैनिक परिवाराची दिशाभुल करू नये.त्रिदल माजी सैनिक संघ ही संघटना महाराष्ट्र राज्याची संघटना असती तर अहमदनगर शहरातील गल्ली-गल्लीत व चौका-चौकात या संघटनेचे नाव भेटले असते का?अहमदनगर शहरातील सर्व सैनिक व सैनिक परिवाराला जाहिर आव्हान करण्यात येते की,कोणाच्याही भुलथापांना बळी पडू नका.आपण आपल्या गल्लीत व चौकात संघटना काढून सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावे असे जाहिर आव्हान त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप(भाऊ)लगड यांनी केले आहे.
0 टिप्पण्या