प्रतिनिधी :- अहमदनगर
सैनिक आपल्या दारी अभियानात अंतर्गत त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून अहमदनगर शहरात गल्ली-गल्लीत,चौका-चौकात शाखा काढण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष आदरणीय मा.अंकुशजी खोटे साहेब व त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष आदरणीय मा.भाऊसाहेब रानमाळ साहेब यांची महाराष्ट्र राज्यातून निवड करण्यात आली आहे.येत्या सहा च महिन्यात अहमदनगर शहरात ७५ शाखा काढण्यात येणार आहे.या सर्व ७५ शाखा अहमदनगर धरमादायी आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे.त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे त्या संघटनेचे नाव त्रिदल माजी सैनिक संघ हे नाव सर्व ७५ शाखांना देण्यात येणार आहे.
या शाखा अहमदनगर धरमादायी आयुक्तांकडे रितसर रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे.अहमदनगर शहरातील सात,नऊ,अकरा सैनिक एकत्र आले की त्वरीत रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे.त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून अहमदनगर शहरातून सुरूवात करण्यात आली आहे.मा.खोटे साहेबांची व मा.रानमाळ साहेबांची अहमदनगर शहरातील सैनिक व सैनिक परिवार एकत्र करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून निवड झाल्याने महाराष्ट्र राज्यातून त्रिदल सैनिक सेवा संघाचे पदाधिकारी व त्रिदल महिला शक्ती आघाडीच्या पदाधिकारी शुभेच्छा देत आहेत.अहमदनगर शहरातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र करण्यासाठी मा.खोटे साहेब यांची निवड करण्याचा आग्रह त्रिदल सैनिक सेवा संघ अहमदनगर टीमने केल्याने महाराष्ट्र राज्यातीच्या टीमने मा.खोटे साहेब यांची निवड करण्यात आली आहे.तरी येत्या सहाच महिन्यात त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून त्रिदल माजी सैनिक सेवा संघ या नावाने शाखेचे भव्य व दिव्य उद्घाटन होणार आहे.ते मा त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष मा.अंकुशजी खोटे साहेब व त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष मा.भाऊसाहेब रानमाळ साहेब यांची निवड करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या