वॉरंटमध्ये अटक टाळण्यासाठी हातकणंगले पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी २ हजारासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…!

 वॉरंटमध्ये अटक टाळण्यासाठी हातकणंगले पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी २ हजारासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…!

लोणी काळभोर 
अजामीनपात्र वॉरंटमध्ये अटक टाळण्यासाठी दोन हजाराची लाच स्विकारताना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार मुकुंद रणमोडे व होमगार्ड गजेंद्र थोरात यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना ताजी असतानाचा, अटक वॉरंट निघालेल्या मॅकेनिकलला अटक न करता गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजार रुपये लाच स्विकारताना हातकणंगले पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आज शुक्रवारी (ता.२) रंगेहाथ पकडले आहे.नामदेव औदुंबर कचरे (वय – ३६) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका मॅकेनिकलने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅकेनिकलविरोधात धारवाड न्यायालयात खटला दाखल आहे. तक्रारदार हा न्यायालयीन कामकाजासाठी हजर राहत नव्हते. त्यामुळे धारवाड न्यायालयाने त्याला अटक वॉरंट बजावले होते. संबंधित आदेशाची प्रत घेऊन हातकणंगले पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी मॅकेनिकल तक्रारदाराच्या घरी गेले. परंतु पोलीस नाईक नामदेव कचरे यांनी तक्रारदार यांच्याकडे अटक वॉरंट प्रकरणात मदत करतो. असे सांगून दोन हजार रुपये लाच मागितली. याप्रकरणी मॅकेनिकलने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. या सापळ्यात आरोपी नामदेव कचरे हा तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. 

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नितीन कुंभार , पोलीस उपनिरीक्षक संजीव बबर्गेकर, पोलीस अंमलदार शरद पोरे, विकास माने, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, मयूर देसाई, विष्णू गुरव यांच्या पथकाने केली आहे.दरम्यान, पोलीस, महसुल विभाग अथवा कोणत्याही सरकारी कर्मचारी म्हणजेच लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार द्यावी असे आवाहन कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या