प्रतिनिधी :- आष्टी
त्रिदल महिला शक्ती आघाडीच्या आष्टी तालुकाध्यक्षा पदी सौभाग्यवती नुतनताई काकासाहेब चव्हाण यांची बिनविरोध एक मताने निवड करण्यात आली.
आष्टी तालुक्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्रिदल महिला शक्ती आघाडीची स्थापना करण्यात आली.यावेळी त्रिदल महिला शक्ती आघाडीच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा सौभाग्यवती भारती ताई संदीप लगड उपस्थित होत्या यावेळी १५० हून अधिक सैनिक परिवाराच्या महिला व भगिनी उपस्थित होत्या ही निवड लोकशाही मार्गाने करण्यात आली आहे.बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात त्रिदल महिला शक्ती आघाडीची स्थापना करण्यात येणार आहे.असे मत त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष आदरणीय मा.अंकुशजी खोटे साहेब यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले.ज्या पध्दतीने त्रिदल सैनिक सेवा संघाची बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शाखेची स्थापना करण्यात आली.त्याच पध्दतीने येत्या दोन महिन्यात बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात त्रिदल महिला शक्ती आघाडीच्या शाखेची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष आदरणीय मा.श्री.अंकुशजी खोटे साहेब यांनी दिली.
0 टिप्पण्या