प्रतिनिधी : अकलूज : सिनेअभिनेते आणि बिगबॉस फेम अभिजित बिचकुले याने मातंग समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्याबद्दल एकेरी शब्द वापरून मातंग समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्याच्यावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा यामागणीसाठी मातंग संघर्ष समितीने आक्रमक होऊन अकलूज पोलीस स्टेशनमध्ये निवेदन सादर केले आहे.
यावेळी क्रांतिकारी संघर्ष सेनेचे अध्यक्ष गणेश भोसले,जनकल्याण बहुजन महासंघाचे अध्यक्ष संतोष खंडागळे,बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,जनसेवा संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ साठे,मैत्री प्रतिष्ठान चे महेश शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश सोनवणे,सोमनाथ लोखंडे,वैभव लोखंडे,अमोल भोसले,मोहन खंडाळे,एकनाथ भोसले,अशोक अवघडे,दीपक लावंड,इत्यादी उपस्थित होते.
अभिजित बिचकुले यांनी मातंग समाजाच्या अस्मिता असलेल्या लहुजी वस्ताद साळवे यांचा एकेरी उल्लेख केला असून बिचकुले माळशिरस तालुक्यातील कोणत्याही गावात आल्यास त्याची कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही असे मत क्रांतिकारी संघर्ष सेनेचे अध्यक्ष गणेश भोसले यांनी व्यक्त केले.

0 टिप्पण्या