विद्यार्थ्यांनी शिवरायांचा आदर्श घ्यावा : प्राध्यापक मगर.

विद्यार्थ्यांनी शिवरायांचा आदर्श घ्यावा : प्राध्यापक मगर.

 मौजे अकोले खुर्द तालुका माढा येथील गणपती औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात शिवजयंती निमित्त प्राध्यापक विक्रमसिंह मगर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रूपाली बेंदगुडे यांनी दिली. शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व प्रसिद्ध व्याख्याते म्हणून प्राध्यापक विक्रमसिंह मगर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे एक असे राजे होते जे जनतेसाठी जगले व गुलामगिरीच्या जगण्याला त्यांनी नाकारले तसेच शूरवीर व पराक्रमी छत्रपती शिवरायांचा आदर्श प्राध्यापक विक्रमसिंह मगर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समोर ठेवला.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अॕड.विजयराव हिरवे , उपाध्यक्ष बाबा येडगे प्रा.सुकुमार लांडे,प्रा.अक्षय भेंकी प्रा.रचना लामकाने,प्रा.केतकी पाटील,प्रा. कोमल यादव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.रेणुका शिंदे,प्रा.प्राची पुराणिक यांनी समन्वयक म्हणून कार्य केले. संस्थेचे सचिव डॉ.आर.डी. बेंदगुडे यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांचे चरित्र आत्मसात करण्याचे आवाहन केले आणि आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या