7 दिवसात अहवाल सादर करायचा असून 7 महिने उलटले तरी मंडलाधिकारी गप्पच का?
माळशिरस तालुक्यातील महा ई सेवा, केंद्र आपले सेवा केंद्र ज्या ठिकाणी मान्यता देण्यात आले आहे त्या ठिकाणी चालू नसून ते अन्य ठिकाणी सुरू असलेल्या बाबत व आधार संच अन्य ठिकाणी सुरू असलेल्या बाबत दलित महासंघ संस्थापक अध्यक्ष मा. प्रा.डाॅ मच्छिंद्रजी सकटे सर व माहिती सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ लगड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक दिवसापासून तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत असून तहसीलदार जगदीश निंबाळकर माळशिरस यांनी मंडलाधिकारी अकलूज, नातेपुते,माळशिरस, खुडूस, सदाशिवनगर, वेळापूर, दहिगाव, फोंडशिरस,महाळुंग, लवंग,पिलीव या सर्व मंडल अधिकाऱ्यांना दिनांक 05/07/2022 सात तहसीलदार माळशिरस यांनी आपल्या मंडळामध्ये चालू असलेले महा ई सेवा केंद्र,आपले सरकार सेवा केंद्र यांना ज्या ठिकाणी मान्यता देण्यात आले आहे त्या ठिकाणी चालू आहे अगर अन्य ठिकाणी चालू आहे याबाबत प्रत्यक्ष महा ई सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्रास भेट देऊन चालक ऑपरेटर यांच्याकडून युडिआयडी तपासणी करण्यात यावी ज्या ठिकाणी सद्यस्थिती महा सेवा केंद्र आपले सेवा केंद्र चालू आहे त्या ठिकाणी ते चालू आहे का नसलेच त्याबाबतचा जबाब पंचासमक्ष पंचनामा करून कोणत्याही परिस्थितीत सर्व महा ई सेवा केंद्र,आपले सरकार सेवा केंद्र यांची कटाक्षाने पाहणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यात यावा आपल्या अहवालामध्ये त्रुटी असलेल्या निदर्शनास आल्यास आपणास पुढील कारवाईबाबत सामोरे जावे लागेल याबाबत आपणास यापूर्वी देखील माहिती सादर करणेबाबत अवगत करून देखील माहिती वेळेत सादर केली जात नसल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे त्यामुळे संदर्भांन्वय दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने तेथील दोन व्यक्ती यांचे जबाब नोंदवून आपले स्वयं स्पष्ट अभिप्राय अहवाल सात दिवसात या कार्यास सादर करण्यात येण्याबाबतचा असा आदेश दिला होता हाा आदेश देऊन 7 महिने गेले तरी अहवाल तहसील कार्यालयाकडे संबंधित मंडल अधिकारी यांनी सादर केलेला नाही? संबंधित मंडलाधिकारी यांनी तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे निदर्शनास आले आहे या प्रकरणांमध्ये तहसीलदार माळशिरस यांना दिनांक 23/02/2023 रोजी दलित महासंघ व माहिती सेवाभावी संस्था यांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून या प्रकरणास तहसीलदार हे काय कारवाई करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0 टिप्पण्या