रेशनचा गहू काळ्या बाजारात विकणाऱ्यांची मी नाही त्यातली कडी लाव आतली अशी अवस्था?
या सर्व प्रकरणात योग्यती सखोल चौकशी न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्ष करणार तीव्र स्वरूपात आंदोलन
प्रतिनिधी-सचिन रणदिवे
माळशिरस रेशनच्या गव्हाचा काळाबाजार करणान्यावर अध्याप गुन्हा दाखल नाही या संबंधीत अधिकारी व इतर कोणी असतील तर त्यांची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. या विषयी माळशिरस नायब तहसीलदार तुषार देशमुख यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले .
सामाजिक कार्यकर्ते विष्णु वाघमोडे यांनी वेळोवेळी तहसिलदार पुरवठा अधिकारी यांचेकडे तक्रारी देऊन ही संबंधीत कार्यालया कडून डोळेझाक करण्यात येत आहे.
सदर गहू काळ्या बाजारात जाणारा ट्रक नं. MH १२ LT ७६७७ या ट्रकमध्ये ७०किलो प्रमाणे १०९ (गोण्या) गारवडपाटी येथे हा ट्रक पकडून माळशिरस पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आला होता. सदरचा गव्हाचा माल उपस्थित लोकांनी रेशनचा असले बाबत सांगितले सदर तक्रारदाराचे परस्पर पंचनामा करून ट्रक रात्री सोडून देण्यात आलेला आहे.
तरी या प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगारावर तात्काळ गुन्हा दाखल करावा हि विनंती अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल.
यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब शिंदे , तालुका प्रभारी शंकर शेंडगे , माळशिरस विधान सभा उपाध्यक्ष नारायण देवकते सह कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व प्रकरणावरून एकच लक्षात येत आहे की रेशनचा गहू काळ्या बाजारात विकणाऱ्यांची मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली अशी अवस्था झालेली दिसून येत आहे.
0 टिप्पण्या