दौंड तालुक्यातील माहिती सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी एक हजाराहून अधिक पदाधिकारी देणार राजीनामा............राहुल अवचट

प्रतिनिधी :-  दौंड 
दौंड तालुक्यातील सर्व सामान्य व गोरगरीब जनतेच्या मनावर राज्य करणारे सामाजिक कार्यकर्ते संदीप लगड यांनी सन २०१५ ते सन २०१९ पर्यंत दौंड तालुक्यातील प्रत्येक गावात मोफत रेशनिंग कार्ड कॅम्प ठेवून मोफत व घरपोच रेशनिंग कार्ड पोहचविण्याचे काम.माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष मा.संदीप लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.सामान्य गोरगरीब जनतेची सेवा करत असताना सन २०१५ ते २०१९ या चार वर्षामध्ये अवैध वाळू उपसा व अवैध वाळू उपसा वाहतूक,अवैध दारू बंद करण्यासाठी दौंड तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंभरहून अधिक आंदोलन व उपोषण केले.आंदोलनामध्ये शासन व प्रशासनाला जागं करण्यासाठी जागरण गोंधळ,तमाशा,गाढवाचे लग्न,भारून,कीर्तन,हिंदी गाणे,मराठी गाणे, नदीच्या पाण्यामध्ये फायबरमध्ये आंदोलन,नदीला उपोषण,या पध्दतीने अनेक वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन उभा करून सामान्य व गोरगरीब जनतेच्या न्याय व हक्कासाठी संदीप लगड यांनी मोठा त्याग करून एक वर्ष पुणे,अहमदनगर,सोलापूर,उस्मानाबाद जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व अवैध वाळू वाहतुक बंद करण्याया आला.चार वर्षात माहिती सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून रात्रीचे दिवस करून सामान्य व गोरगरीब जनतेच्या मदतीला संदीप लगड धावले.कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये सर्व घरामध्ये बसले होते.तेव्हा संदीप लगड व त्यांची टीमने दौंड तालुक्यातील प्रत्येक गावातील सामान्य व गोरगरीब जनतेला धान्य,किराणा,भाजीपाला वाटण्याचे काम केले.ज्यांना धान्य,किराणा,भाजीपाला कमी पडला की संदीप लगड यांना एक मिस काॅल या काॅल केला तरी धान्य,किराणा,भाजीपाला घरपोच केला जात होता.संदीप लगड व त्यांच्या टीमने कोरोनाच्या महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता सामान्य व गोरगरीब जनतेच्या निस्वार्थपणे सेवा केली.आज दौंड तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जनतेला सामाजिक कार्यकर्ते संदीप लगड यांची गरज भासू लागली आहे.सन २०२० ते आजपर्यंत सामाजिक कार्यकर्ते संदीप लगड यांनी दौंड तालुक्यात एकही काम न केल्याने दौंड तालुक्यातील माहिती सेवाभावी संस्थेचे एक हजाराहून अधिक पदाधिकारी दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी एकत्र येवून वार शुक्रवार दिनांक १०/०३/२०२३ रोजी ठिक ११:०० वाजता माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा संदीप लगड यांच्याकडे राजीनामा देणार आहेत.तरी राजीनामा घेण्यासाठी एक दिवस सामाजिक कार्यकर्ते संदीप लगड यांनी वेळ द्यावा.अशी मागणी दौंड तालुक्यातील माहिती सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या