फलटण शहरांमध्ये नुकत्याच झालेल्या दंडनीय कार्यवाही नंतर देखील फलटण शहर व उपनगर भागातील सी.एफ.एल 3 (कंट्री लिकर) लायसेन्स धारक आपल्या वरच्या मलाईच्या व्यसनातून मुक्त होण्याचे चिन्ह दिसत नाहीत.
एमआरपी पेक्षा जास्त दराने दारू विक्री करणाऱ्या सी.एफ.एल 3 लायसेन्स धारक no.74. यांच्यावर नुकतीच केलेली दंडनीय कार्यवाही ची घटना ताजी असताना देखील फलटण शहर व उपनगर भागातील सी.एफ.एल 3 (कंट्री लिकर) लायसेन्स धारक एम.आर.पी पेक्षा जास्त दराने देशी दारूची विक्री करत आहेत असे दिसून आले.
सदर प्रकरणी आक्रमक समाज सेवक सागर सोनावले(मेजर) यांनी वेळी वेळी आवाज उठवला होता. मागील एक्साईझ विभागाची दंडनीय कार्यवाही देखील त्यांच्या दबावा मुळेच झाली होती. परंतु अजूनही "येरे माझ्या मागल्या" या उक्ती प्रमाणे फलटण शहरातील सी.एफ.एल.-3 लायसेन्स धारकांनी वाढीव दराने मद्य विक्री चालूच ठेवली आहे असे दिसून येत आहे.
या प्रकरणी सागर सोनावले यांनी एक्साईज कमिशनर तसेच एक्साईज विभागाचे उच्च अधिकारी, सातारा डिविजन यांच्याशी चर्चा केली असून. या संदर्भात परिपत्रक काढून योग्य ते आदेश लवकरच होतील असे आश्वासन एक्साईज कमिशनर यांनी दिले.
सदर लूट हे केवळ हिमनगाचे टोक असून, महिन्याची वरची मलाई ही करोडोंच्या घरात असल्याने अधिकारी आणि बड्या धेंड्याच्या वरद हस्ताने व्यावसायिक ही लूट थांबवत नसल्याचे मत या वेळी सागर सोनवले यांनी याप्रसंगी मांडले. लवकरच ही लूट थांबवली नाही तर आंदोलनाचा इशाराही सागर सोनावले यांनी यावेळी दिला.
0 टिप्पण्या