बांधकाम विभागाचे आठ दिवसांत काम चालू करण्याचे लेखी आश्वासन
प्रतिनिधी : अकलूज : काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापसिंह चौक ते धवलनगर रस्त्याचे काम चालू करून वाहनधारकांना होणार नाहक त्रास बंद करण्यात यावा या मागणीसाठी अनुसूचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे यांच्या नेतृत्वाखाली अकलूजमधील प्रतापसिंह चौक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ क्लार्क श्री जे आर गायकवाड यांनी आंदोलन स्थळी येवून येत्या आठ दिवसांत काम चालू करण्यात येईल असे लेखी पत्र रघुनाथ साठे यांना दिले.त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष सतीश पालकर, फिरोज देशमुख,जुल्कर शेख,जनसेवा संघटनेचे चंद्रकांत गायकवाड,राजू देवकर,कालिदास निंबाळकर,ओंकार भोसले,दत्ता खंडागळे,सचिन साठे,मंगेश साठे सनी मिसाळ,अविनाश लोखंडे रामदास चव्हाण,अशोक जाधव सुखदेव निंबाळकर,प्रभाकर खंडागळे,स्वामी खंडागळे,मामा लोखंडे,विठ्ठल माने,सोमनाथ लोखंडे,रोहितसाळुंखे,अमोल आरडे,जीवन साठे,आकाश अडसूळ,पंकज लोखंडे,संतोष खंडागळे,सतीश साठे,वैभव लोखंडे,नवनाथ खंडागळे,नाना लोखंडे,अमोल चव्हाण,राजू खंडागळे,शुभम सप्ताळे,सतीश मोहिते,नवनाथ खंडागळे,जय किशन लोखंडे,मसू सकट,संदीप खंडागळे,अनिल कांबळे,शंकर खंदारे,अतुल खंडागळे,उपस्थित होते.आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किरण साठे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष जाकीर शेख,राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,युवक शहराध्यक्ष अविनाश सोनवणे,शहर उपाध्यक्ष इरफान बागवान,सरफराज बागवान,अविनाश लोखंडे यांनी पाठिंबा दिला.
0 टिप्पण्या