तिरवंडी माळशिरस रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करून मिळावे या मागण्यासाठी तहसीलदार माळशिरस यांना ग्रामपंचायत सदस्य शामराव बंडगर यांचे निवेदन

तिरवंडी माळशिरस रस्त्यावरील खड्डे 
दुरुस्त करून मिळावे या मागण्यासाठी तहसीलदार माळशिरस यांना ग्रामपंचायत सदस्य शामराव बंडगर यांचे निवेदन

तिरवंडी माळशिरस रस्त्याचे काम मेघा कंपनीने निकृष्ट दर्जाचे केल्याचा शामराव बंडगर यांचा आरोप


मौजे तिरवंडी माळशिरस या रस्त्यावरून मेगा कंपनीने गेल्या 4 वर्षा पासून अवजड वाहतुक केली होती त्यामुळे अवजड वाहतूक केल्यामुळे रस्ता अतिशय मोडखळीस आला होता त्या दरम्यान तिरवंडी येथील ग्रामस्थांना सोबत घेऊन सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य शामराव बंडगर यांनी वारंवार पाठपुरावा करून आंदोलन मोर्चे काढून या रस्त्याची दुरुस्ती करून घेतली परंतु त्या रस्त्यांचे काम निकृष्ठ दर्जाचे कंपनीने केल्यामुळे आत्ता माळशिरस तिरवंडी रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले अहित तरी मेगा कंपनी कडुन हे खड्डे दुरुस्त करण्यात यावेत, रस्त्याने ये जा करणारे शालेय विद्यार्थी जेष्ठ नागरीक यांना अतिशय नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी मेगा कंपनीकडून लवकरात लवकर तिरवंडी माळशिरस रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करून मिळावे अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य शामराव बंडगर यांनी तहसीलदार माळशिरस यांना दिले. अन्यथा लवकरात लवकर माळशिरस तिरवंडी रस्त्यावरील खड्डे दुरुस्त न केल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य शामराव बंडगर यांनी बोलताना दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या