मारकडवाडी येथील वश्या मारुती मंदिर परिसरातील गायरान जमीन गट नंबर 233 चे मोजणीच्या मागणीसाठी ग्रामस्थ करणार आरपारची लढाई
मौजे मारकडवाडी तालुका माळशिरस येथील गायरान जमीन गट नंबर 233 चे मोजणी कामे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी दिनांक 21-10-2022 रोजी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय माळशिरस यांनी तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच मारकडवाडी यांच्या मागणीनुसार मौजे माकडवाडी येथील गायरान जमीन गट नंबर 233 शासकीय मोजणी आवश्यक असणारी शासकीय मोजणी फी संबंधितांकडून भरून घेऊन नियमानुसार मोजणी करणे कामी उपाधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय माळशिरस यांच्या स्तरावरून योग्य ती कारवाई करणे बाबत तहसीलदार यांनी कळविले होते. त्या अनुषंगाने तत्कालीन सरपंच ग्रामपंचायत मारकवाडी यांनी उप अधीक्षक भुमिअभिलेख कार्यालय माळशिरस यांच्याकडे 21-10-2022 अति तात्काळ मोजणीचे चलन देखील भरले होते आज पाच महिने उलटले तरी अद्याप पर्यंत उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय माळशिरस यांच्याकडून मौजे मारकडवाडी येथील गायरान जमीन गट नंबर 233 या गटाची मोजणी कामे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही म्हणून दि.23-03-2023 रोजी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयासमोर वश्या मारुती मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते,समस्त ग्रामस्थ मारकडवाडी वतीने तीव्र स्वरूपात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशा आशयाचे निवेदन माळशिरस तालुक्याचे कार्यतत्पर,कार्यक्षम, कर्तव्यदक्ष निवासी नायब तहसीलदार तथा तहसीलदार तुषार देशमुख यांना देण्यात आले आहे. यावेळी अमित आण्णा वाघमोडे-पाटील,पै.रणजीत मारकड, युवराज मारकड,पांडुरंग चोपडे,दादा मारकड, महादेव भाळे, सोपान काका वाघमोडे, मोहन चोपडे, आप्पा मारकड, तानाजी मारकड, बाजीराव मारकड,नितीन राऊत, शशिकांत भिवा राऊत, हनुमंत पिसाळ, धनाजी पिसाळ, रामचंद्र मारकड,धनाजी मारकड, हनुमंत मारकड, चेअरमन गजानन गोरे,मारुती गोरे, सुखदेव बोराटे, सावता बापू गोरे, तात्याबा लवटे, वैभव रामचंद्र वाघमोडे, सचिन रणदिवे, शेखलाल शेख, आनंदा गोरे यांच्यासह वश्या मारुती मंडळाचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर निवेदनाच्या माहितीसाठी प्रती सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब,माळशिरस पोलीस स्टेशन माळशिरस,नातेपुते पोलीस स्टेशन नातेपुते यांना दिले आहेत.
0 टिप्पण्या