त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य या संघटनेचा महाराष्ट्र राज्यातील सैनिक परिवारासाठी मोठा निर्णय.संदीप लगड................!


प्रतिनिधी  :- दौंड 
महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र करण्यासाठी व सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघा महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून सैनिक आपल्या दारी अभियानात अंतर्गत त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्व सैनिक संघटना एकत्र करण्याचा मोठा निर्णय त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा संदीप लगड यांनी घेतला आहे.प्रत्येक गावात जावून त्या गावातील संघटनेचे नाव गाव लेवला जुनेच नाव राहणार आहे. प्रत्येक गावातील सैनिक संघटनेचा एक प्रतिनिधी तालुका लेवला घेवून तालुक्यातील प्रत्येक गावातील सर्व संघटना एकत्र करून तालुक्याच्या संघटनेला त्रिदल हे नाव दिले तर पॅरामिलेर्टी,आर्मी,नेव्ही,एअरफोर्स एकत्र येवू शकतात.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक प्रतिनिधी जिल्हास्तरीय घेण्यात येणार आहे.काही पदाधिकारी साहेबांची निवड विभागात तर काही पदाधिकारी साहेबांची निवड राज्यस्तरीय करण्यात येणार आहे.ही निवड लोकशाही मार्गाने करण्यात येणार आहे.या संघटनेमध्ये अधिकारी वर्गाला व दोन टक्के राजकिय माजी सैनिकांना सभासदत्व दिले जाणार नाही.चुकून हुकून सभासदत्व दिले तरी फक्त नि फक्त दोन दिवसात हकालपट्टी केली जाते.
महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराने कोणत्याही राजकीय पक्षाच्या सेल व आघाडी मध्ये सामील होऊ नये.महाराष्ट्र राज्यातील राजकीय पक्ष सैनिक व सैनिक परिवारामध्ये फुट पाडण्याचे काम करत आहेत.त्या राजकिय पक्षापासून सावधान काही आपल्याच काही बांधवांची राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दिशाभुल करून राजकिय पक्षाची सेल व आघाडीची स्थापना करत आहेत,तरी महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराने एकत्र आले तर आपल्या मागण्या मान्य होण्यास वेळ लागणार नाही.तरी महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराने आपल्याच गावात शाखा काढून सुरूवात केली पाहिजे असे मत त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे अध्यक्ष मा.जे.के.कटके यांनी व्यक्त केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या