एजेएफसी च्या माळशिरस तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष पदी शोभा वाघमोडे तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब कदम यांची निवड

एजेएफसी च्या माळशिरस तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष पदी शोभा वाघमोडे तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब कदम यांची निवड

 प्रतिनिधी : ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल (ए जे एफ सी) या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यासिन पटेल यांच्या मार्गदर्शना खाली सोलापूर जिल्हा अध्यक्ष अभिमन्यू आठवले यांच्या उपस्थितीत माळशिरस तालुका अध्यक्षपदी पत्रकार शोभा तानाजी वाघमोडे तर उपाध्यक्षपदी पत्रकार बाळासाहेब महादेव कदम यांची निवड नातेपुते येथील बैठकीत करण्यात आली असून नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष अभिमन्यू आठवले व तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आला.
यावेळी पत्रकार विलास भोसले श्रीराम भगत महाराज आबा भिसे संजय पवार बशीर शेख हनुमंत माने एडवोकेट नंदकुमार पिसे अमोल साठे आदी पत्रकार उपस्थित होते.

 निवडीनंतर नूतन अध्यक्ष शोभा वाघमोडे म्हणाल्या ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल भारत सरकार मान्य प्राप्त संघटना असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून सहकाऱ्यांना बरोबर घेऊन संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात सामाजिक उपक्रमाबरोबर सर्वसामान्य लोकांसाठी काम करणार असून संघटनेने माझ्यावर टाकलेले तालुका अध्यक्ष पदाची टाकलेली जबाबदारी मी प्रमाणिकपणे निभवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .
 
 यावेळी उपाध्यक्ष बाळासाहेब कदम म्हणाले ए जे एफ सी संघटना पत्रकारांच्या समस्येसाठी आवाज उठवून पत्रकारांच्या मागण्या सरकार दरबारी मांडणार असल्याचे सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या